Join us  

ए. आर. रहमान पहिल्यांदाच या ठिकाणी करणार लाइव्ह कॉन्सर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:10 PM

ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायिका नीती मोहन, जोनिता गांधी व आदित्य नारायण परफॉर्म करणार आहेत.

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या स्वर मैफिलीचा आस्वाद पुणेकरांना लुटता येणार आहे. २२ फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये ए. आर. रहमान यांचे लाइव्ह कॉन्सर्ट पार पडणार आहे. ते पहिल्यांदाच पुण्यात लाइव्ह कॉन्सर्ट करणार आहेत. 

या कॉन्सर्टचे आयोजक व एक्सेलेन्सिया इव्हेंट्स हॉस्पिटिलिटी अँड मॅनेजमेंटचे संचालक मनीष लांजेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ए.आर. रहमान यांच्या संगीताने भारतातील नाही तर जगभरातील लोकांना कित्येक वर्षांपासून वेड लावले आहे. या कॉन्सर्टमध्ये ए.आर.रहमान यांच्यासोबत गायिका नीती मोहन, जोनिता गांधी, हरिचरण, आदित्य नारायण व रणजित बारोट हे गायक एकापेक्षा एक दमदार गाणी सादर करणार आहेत.

या लाइव्ह कॉन्सर्टच्या तिकिटासाठी पेटीएम इनसाइडर पार्टनर आहे. तिकिट घेण्यासाठी एक्सक्लुसिव्ह एक्सेस ११ जानेवारी पासून साइन अप करणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. १२ जानेवारीपर्यंत सगळ्यांसाठी तिकिट उपलब्ध राहतील.

टॅग्स :ए. आर. रहमानपुणे