Join us

परी म्हणते,‘रणवीरने शोधली माझ्यातली अभिनेत्री’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 22:09 IST

सोशल मीडियावर सध्या परिणीती तिच्या सेक्सी आणि हॉट लुक्समुळे चर्चेत आहे.

सोशल मीडियावर सध्या परिणीती तिच्या सेक्सी आणि हॉट लुक्समुळे चर्चेत आहे. ती म्हणते,‘ रणवीर सिंग हा असा व्यक्ती आहे ज्याने माझ्यातली अभिनेत्री शोधून काढली. निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांच्यासमोर तिने हे कबूल केले आहे.’ती पुढे म्हणते,‘ रणवीरने मला आरशासमोर ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स करताना पाहिले. त्याने मला जवळून पाहिले. आणि तो मला म्हणाला,‘आता तु एक उत्तम अभिनेत्री बनण्याच्या मार्गावर आहेस. आणि ते खरंच खर झालं. हे वक्तव्य त्याने आदित्य चोप्रा आणि मनीष यांच्याही पूर्वी केले.तो मला म्हणाला,‘बघ मी ‘हिरा’ शोधून काढला.’ परिणीतीने २०११ मध्ये ‘लेडिज व्हर्सेस रिकी बहल’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. यात रणवीर सिंग देखील होता. ती आता आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ मध्ये डेब्यूटंट अक्षय रॉय सोबत दिसणार आहे. तिने यात नवोदित गायिकेची भूमिका केली आहे.}}}}