Join us  

बाबो ! रिलीज पूर्वीच Allu Arjun च्या Pushpa सिनेमाने कमाईबाबत केला धमाका, आकडा वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 6:20 PM

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा चित्रपट 'पुष्पा'ने रिलीज होण्याआधीच 250 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे.

साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा बहुचर्चित चित्रपट पुष्पा द राईज येत्या १७ डिसेंबरला रिलीज होतो आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना(Rashmika Mandanna) स्टारर दिग्दर्शक सुकुमार (Sukumar)  यांचा हा चित्रपट तामिळ, तेलुगु आणि हिंदी व्यतिरिक्त मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही सुरू झाले आहे. या मेगा बजेट असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. दरम्यान, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केल्याचे वृत्त आहे. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्ट्सनुसार, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा रिलीज होण्या आधीच 250 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाने डिजिटल राईट्स आणि ओटीटी रिलीज राईट्सच्या माध्यमातून ही रक्कम मिळवली आहे.यामुळे चित्रपटाने त्याच्या खर्चाचा मोठा हिस्सा आधीच वसूल केला आहे.

चंदन तस्कर विरप्पन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जात आहे पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुन या चित्रपटात दुहेरी भूमिका निभावताना दिसणार आहे. सुरुवातीला जंगलात चंदनाची तस्करी करणारा खलनायकाच्या भूमिकेत तसेच नायकाच्या भूमिकेतही तो दिसणार आहे. एक्शन थ्रिलरने भरलेला हा चित्रपट सुपरहिट ठरणार अशी चर्चा आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनरश्मिका मंदाना