Join us  

Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या 'पुष्पा २'च्या बजेटचा आकडा पाहून जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 5:19 PM

Pushpa 2: अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे आणि बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने देशभरात प्रचंड कमाई केली आणि बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) यांची लोकप्रियता 'पुष्पा' मुळे प्रचंड वाढली आहे, हे पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'पुष्पा २' (Pushpa 2) वर भरपूर पैसा खर्च करण्याचे ठरवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रेक्षकांच्या अपेक्षांनुसार 'पुष्पा २' चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी मोठी रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

'पुष्पा' चित्रपटाशी संबंधित एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, निर्मात्यांनी पहिल्या भागावर १९४ कोटी रुपये खर्च केले होते, परंतु यावेळी ते सुमारे ४०० कोटी रुपये खर्च करण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने मीडियाला सांगितले की, 'पुष्पा २ चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी पूर्ण होईल. यानंतर, पुष्पा २ च्या पोस्ट-प्रोडक्शनसाठी सुमारे ४ महिने लागणार आहेत. पुष्पा चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन घाईघाईने करण्यात आले कारण निर्मात्यांना तो वेळेवर प्रदर्शित करायचा होता. मात्र, यावेळी निर्मात्यांना तीच चूक पुन्हा करायची नाही. पुष्पाच्या पहिल्या भागावर निर्मात्यांनी १९४ कोटी रुपये खर्च केले होते, तर यावेळी निर्मात्यांनी ४०० कोटींचा बजेट ठरवला आहे.

चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बोलायचे झाले तर 'पुष्पा २'मध्ये काही हिंदी कलाकारही दिसणार असल्याचे बोलले जात आहे. 'KGF 2' चे बंपर यश पाहून, निर्मात्यांनी ठरवले आहे की ते 'पुष्पा २' साठी काही हिंदी कलाकारांना देखील साइन करणार आहेत. जेणेकरुन चित्रपटाला हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल. 'पुष्पा' या चित्रपटात हिंदी कलाकार नव्हते, पण असे असूनही हिंदी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवली.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना