Join us  

प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचं निधन, वयाच्या ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:56 PM

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाच्या अफवा उडाल्या होत्या

पंजाबी गायक सुरिंदर शिंदा (Surinder Shinda) यांचं आज निधन झालं आहे. लुधियाना डीएमसी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय ६४ वर्ष होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर फूड पाईपचं ऑपरेशन झालं होतं. यानंतर त्यांच्या शरिरात इन्फेक्शन वाढलं. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची निधनाची अफवाही उडाली होती. मात्र मुलाने सोशल मीडियावर अफवांवर स्पष्टीकरण दिलं होतं. आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी जोगिंदर कौर, दोन मुलं आहेत.

सुरिंदर शिंदा यांचा जन्म लुधियानामधील अयाली या छोट्याशा गावात झाला. त्यांना आईवडिलांकडूनच संगिताचा वारसा लाभला. यामुळे वयाच्या ४ थ्या वर्षापासूनच त्यांना संगितात गोडी निर्माण झाली. त्यांचं खरं नाव सुरिंदर पाल धम्मी आहे. शिंदा यांना उस्ताद मिस्तारी बचन राम यांनी संगीताचं शिक्षण दिलं. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली. 

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिंदा यांनी एसआयएस लुधियानामध्ये प्रवेश घेतला. शॉर्ट इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मेकॅनिकलचा कोर्स केला. गायक होण्याआधी त्यांनी नोकरी केली. मात्र गायनाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच नोकरी सोडून त्यांनी प्रोफेशनल सिंगर होण्याचा निर्णय घेतला. 

'उच्चा बुर्ज लाहौर दा' हे त्यांचं पहिलं गाणं सुपरहिट झालं होतं. 1979 मध्ये त्यांनी 'रख ले क्लिंदर यारा' हा अल्बम आणला. त्यांना पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये यश मिळालं.

टॅग्स :लुधियानामृत्यू