Join us  

पंजाबी अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन, युगांडामध्ये घेतला अंतिम श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 1:13 PM

Sukhjinder Shera passed away : पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत आज आणखी एका धक्क्याने हादरली. पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेतेव दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे आज निधन झाले.

ठळक मुद्देगेल्या महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले होते. पंजाबी सिनेमांसोबत बॉलिवूडच्या 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये सतीश कौल यांनी काम केले होते.

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत आज आणखी एका धक्क्याने हादरली. सतीश कौल यांच्या निधनानंतर पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक सुखजिंदर शेरा (Sukhjinder Shera ) यांचे आज निधन झाले.सुखजिंदर हे युगांडाला होते. बुधवारी तिथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांचे अस्टिस्टंट जगदेव सिंह यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.सुखजिंदर शेरा गेल्या महिन्यात आपल्या एका मित्राला भेटायला केनियाला गेले होते. 25 एप्रिलला येथे त्यांना ताप आला आणि त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रकृती बिघडल्यावर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे 2 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सुखजिंदर यांनी अनेक लोकप्रिय पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले होते. यारी जट्ट दी, जट्ट ते जमीन या सिनेमात ते दिसले. सध्या ते यार बेली या सिनेमाचे शूटींग करत होते. शेरा हे लुधियानामधील जगरावमधील मलकपूर येथील रहिवासी होते. सुखजिंदर यांचे पार्थिव पंजाबमध्ये आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे प्रयत्न सुरू आहेत.गेल्या महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेते सतीश कौल यांचे निधन झाले होते. पंजाबी सिनेमांसोबत बॉलिवूडच्या 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये सतीश कौल यांनी काम केले होते. सतीश कौल दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि यातच त्यांचे निधन झाले होते. सतीश यांनी महाभारतात इंद्रदेवाची भूमिका साकारली होती.

टॅग्स :बॉलिवूड