Join us  

महाभारत मालिकेतील 'दुर्योधन' पुनीत इस्सर यांचा मुलगा करतोय डेब्यू, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:00 AM

बॉलिवूडमध्ये रोज नव्या स्टार किडची एन्ट्री होत असताना आता आणखी एका स्टारकिडचा डेब्यू होतोय.

ठळक मुद्दे‘लास्ट डिल’ या चित्रपटात सिद्धांतसोबत प्रीति चौधरी,सुपर्णा, अमित पचौरी मुख्य भूमिकेत आहेत.

बॉलिवूडमध्ये रोज नव्या स्टार किडची एन्ट्री होत असताना आता आणखी एका स्टारकिडचा डेब्यू होतोय. होय, ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणारे फिट अ‍ॅण्ड फाईन बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्शक पुनीत इस्सर याचा मुलगा सिद्धांत इस्सर बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. ‘लास्ट डिल’ या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

सिद्धांतला आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या वडिलांसह कोरिओग्राफर व दिग्दर्शक गणेश आचार्य, कॉमेडियन एहसान कुरेशी, पवन कौशिक असे अनेक जण पोहोचले. यावेळी बोलताना पुनीत इस्सर भावूक झालेले दिसले.

माझ्या मुलाने स्वबळावर हा चित्रपट मिळवला, याचा मला आनंद आहे. त्याने ऑडिशन दिले आणि आपल्या डेब्यूसाठी एक आव्हानात्मक भूमिका निवडली, असे ते म्हणाले.

‘लास्ट डिल’ या चित्रपटात सिद्धांतसोबत प्रीति चौधरी,सुपर्णा, अमित पचौरी मुख्य भूमिकेत आहेत. राजेश के. राठी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. लवकर या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  पुनीत यांनी महाभारतात दुर्योधन ही भूमिका साकारली होती.  चेह-यावर कपटी हास्य आणि पांडवांविरोधात कटकारस्थान रचणा-या दुर्योधनाची भूमिका त्यांनी पडद्यावर जिवंत केली होती. या मालिकेशिवाय त्यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये अभिनयाची छाप सोडली आहे. 2004मध्ये त्यांनी सलमान खान स्टारर ‘गर्व’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 

पुनीत यांनी १९८३मध्ये ‘कुली’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. मात्र पदार्पणाच्या या चित्रपटात पुनीत यांच्यामुळे अमिताभ बच्चन मृत्यूच्या दाढेत पोहोचले होते. बिग बी आणि पुनीत इस्सर यांना चित्रपटासाठी एक महत्वाचे दृश्य चित्रीत करायचे होते. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक होत इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले होते. 

टॅग्स :पुनीत इस्सार