Join us  

Pulwama Attack :'हिंदी मीडियम'च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 8:00 PM

हिंदी मीडियमच्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी कली असल्याचे समजते आहे.

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याविरोधात बॉलिवूडने जोरदार निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बॉलिवूडमध्ये बंदी घालण्याचा निर्णय ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन घेतला आहे. तर दुसरीकडे हिंदी मीडियमच्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी कली असल्याचे समजते आहे.

सबा कमर इरफान खानसोबत हिंदी मीडियममध्ये झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटाच्या कथेबरोबरच सबाचंही भरभरून कौतुक प्रेक्षकांनी केले होते. मात्र सबाला हिंदी मीडियमच्या सीक्वलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सबाऐवजी राधिका आपटे किंवा राधिका मदन या दोन अभिनेत्रीची वर्षी चित्रपटासाठी लागू शकते.राधिकाला या चित्रपटात इरफान खानच्या पत्नीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. या चित्रपटासंदर्भात अधिकृत घोषणा व्हायची आहे. गेल्या वर्षभरापासून अभिनेता इरफान खान कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार घेत होता. मात्र काही दिवसांपूर्वी तो भारतात परतला असून सध्या मुंबईत उपचार घेत आहे. उपचारानंतर इरफानला किमान वर्षभराची विश्रांती सांगण्यात आली आहे. त्यामुळे हिंदी मीडियमच्या सीक्वलच्या कामाला उशीरा सुरूवात होईल.

टॅग्स :इरफान खानपुलवामा दहशतवादी हल्ला