Join us  

प्रियांका-निकच्या रिसेप्शनचं invitation Card व्हायरल, बघा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:14 AM

प्रियांका चोप्राचे लग्न अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.

ठळक मुद्देप्रियांका-निक मिनी हनीमूनसाठी ओमाना जाऊन मुंबईत परतले आहेत प्रियांकाचे रिसेप्शन कार्ड इंटरनेटवर व्हायरल होतंय

प्रियांका चोप्राचे लग्न अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यानंतर प्रियांकाने दिल्लीत रिसेप्शनदेखील दिले. या रिसेप्शन सोहळ्याला पतंप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ईशा अंबानीच्या प्री-वेडिंग सेरमनीनंतर प्रियांका-निक मिनी हनीमूनसाठी ओमाना जाऊन मुंबईत परतले आहेत. 

 मुंबईत प्रियांका दोन रिसेप्शन देणार आहे. पहिले 19 डिसेंबरचे रिसेप्शन फॅमिलीसाठी तर 20 डिसेंबरला बॉलिवूडसाठी. नुकतेच प्रियांकाचे रिसेप्शन कार्ड इंटरनेटवर व्हायरल होतंय. यात 20 तारखेचा वेन्यू लिहिला आहे.   

 

प्रियांकाच्या कामाबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच  'द स्काय इज पिंक’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्यानंतर ती लगेच संजय लीला भन्साळींच्या सिनेमात दिसणार आहे. भन्साळींच्या सिनेमात प्रियांका ‘लेडी डॉन’ बनणार असल्याचे कळते.

 प्रियांकाचा हा चित्रपट मुंबईतील कामाठीपुरातील मॅडम गंगुबाईच्या ख-या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. हुसैन जैदी यांनी लिहिलेल्या ‘माफिया क्विन आॅफ बॉम्बे’ या पुस्तकात गंगूबाईची माहिती दिली आहे. चित्रपटाचे कथानक यावर आधारित असेल. आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या  यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.   

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास