Join us  

Priyanka Nick Wedding : मेहंदी सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या पायाला झाली दुखापत, बोलवावा लागला डॉक्टर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 7:20 PM

जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. शनिवारी प्रियांकाची मेहंदी व संगीत सेरेमनी रंगली. मात्र या सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या जखमी झाली.

ठळक मुद्दे, मेहंदी सेरेमनीदरम्यान प्रियांकाच्या पायाला दुखापत झाली. यानंतर डॉक्टरला बोलवून पीसीच्या पायाला बँडेज बांधावे लागले. 

जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका चोप्राच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु आहे. शनिवारी प्रियांकाची मेहंदी व संगीत सेरेमनी रंगली. मात्र या सेरेमनीपूर्वी प्रियांकाच्या जखमी झाली.होय, पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, मेहंदी सेरेमनीदरम्यान प्रियांकाच्या पायाला दुखापत झाली. यानंतर डॉक्टरला बोलवून पीसीच्या पायाला बँडेज बांधावे लागले. सेलिब्रेशनदरम्यान तिला वेदना होऊ नये़, यासाठी पेनकिलरही देण्यात आले.प्रियांका उमेद भवनाच्या ज्या खोलीत थांबली होती, तिथे वुडन फ्लोर होते. फ्लोरचे काही काम सुरू होते. फ्लोरवरून चालताना पीसीच्या पायाला काहीतरी रूतले आणि तिच्या पायातून रक्त वाहू लागले. यानंतर लगेच डॉक्टरला बोलवण्यात आले. प्रियांकाच्या हातावर मेहंदी सजली, तेव्हा तिच्या पायावर क्रेप बँडेत बांधलेले होते. अर्थात तरिही प्रियांकाने लग्नाचा प्रत्येक सोहळा एन्जॉय केला.

प्राप्त माहितीनुसार, लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनने कुणी फोटो घेऊ नये यासाठी खास इस्राईलवरून १२ शूटर्स बोलवण्यात आले आहेत. जेणेकरून उमेद भवनच्या आकाशात एकही ड्रोन दिसल्यास त्याला तत्काळ शूट केले जावे. अर्थात उमेद भवन पॅलेसच्या आजूबाजूचा भाग आधीच नो फ्लार्ईंग झोन आहे. अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास