Join us  

प्रियंकानेही केला होता आत्महत्येचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2016 12:52 AM

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री धक्क्यात असताना, आजची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्याबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे....

प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री धक्क्यात असताना, आजची आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोपडा हिच्याबद्दल धक्कादायक बाब समोर आली आहे.प्रियंकाने आपल्या स्ट्रगल काळात आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा दावा प्रियंकाचा माजी मॅनेजर प्रकाश जाजू याने केला आहे. केवळ एकदा नाही तर तिनदा प्रियंकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे जाजूने म्हटले आहे. एका पाठोपाठ एक असे  ट्विट करून जाजूने हा दावा केला.आजघडीला प्रियंका इंटरनॅशनल स्टार बनली आहे. पण, बॉलिवूडमधील स्ट्रगल करताना एका क्षणाला ती कोलमडली होती. आज ती स्ट्राँग दिसत असली तरी संघर्षाच्या दिवसात अतिशय हळवी होती. दोन-तीनदा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला पण मी कसेबसे तिला यापासून परावृत्त केले, असे जाजूने म्हटले आहे. जाजूने प्रियंकाचा कथित ब्रॉयफ्रेन्ड असीम मर्चेंट याचाही उल्लेख केला आहे. असीमच्या आयुष्यात अनेक मुली होत्या. प्रियंका यामुळे तणावात राहायची व त्याला रात्रीबेरात्री फोन करायची. एकदा असीमसोबत भांडल्यानंतर प्रियंका आत्महत्या करण्याच्या इराद्याने मुंबईच्या वसई भागात पोहोचली होती. मी अनेक प्रयत्नांनी प्रियंकाची असे न करण्याबद्दल समजूत काढली, अशी माहितीही जाजूने एका  ट्विटरद्वारे दिली आहे. प्रियंका असीमच्या आईच्या खूप जवळची होती. २००२मध्ये असीमच्या आईचे निधन झाल्यानंतर प्रियंका मनातून पार कोसळली आणि तिने एका अपार्टमेंटच्या खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर या खिडकीला लोखंडाचे ग्रील लावले गेले. तोपर्यंत प्रियंकाला अक्षरश: खुर्चीला बांधून ठेवले गेले होते, असेही एक ट्विट जाजूने केले आहे.}}}}तूर्तास प्रियंका व प्रकाश जाजू यांचे संबंध पुरते बिघडले आहेत. काही मतभेदानंतर प्रियंकाने जाजूसोबतचा करार संपुष्टात आणला होता.२००८ मध्ये प्रियंकाच्या वडिलांनी जाजूविरूद्ध तक्रार दाखल करीत जाजू आपल्या मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता.या तक्रारीनंतर जाजूला ६८ दिवस तुरुंगात घालवावे लागले होते. यापूर्वीही जाजूने प्रियंकाबद्दल असे अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.