Join us
Daily Top 2Weekly Top 5

आनंद पोटात माझा मावेना! आई झाल्यानंतर प्रियांकाला आकाश ठेंगणं; लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 18:21 IST

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ने नुकतीच सरोगसीद्वारे आई झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर आता तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पहिली पोस्ट शेअर केली आहे, ज्याला प्रचंड पसंती मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ने अलीकडेच पती निक जोनास (Nick Jonas)सोबत चाहत्यांना सांगितले की, दोघेही सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर, या जोडप्याच्या जवळच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आई झाल्यानंतर प्रियांकाचा आनंद गगनात मावेनासा झाल आहे. आता तिने बाळाच्या घोषणेनंतर पहिली पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिला कसे वाटते आहे ते सांगितले आहे.

प्रियांका चोप्रा कारमध्ये बसून रियर मिरर सेल्फी घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रकाश चांगला वाटतो आहे. पहिल्या फोटोमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्यावरची चमक स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती सनग्लासेस घालून पोझ देताना दिसत आहे. त्याच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत.

प्रियंका चोप्राने तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत. एका यूजरने लिहिले, ग्लो. दुसर्‍याने कमेंट केली, हॅलो मम्मी. याशिवाय यूजर्स सुंदर आणि गॉजर्स अशा कमेंट करून प्रियांकाचे खूप कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोंना आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास