Join us  

प्रियंका चोप्राच्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 7:15 PM

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरच 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोंबरला होणार प्रदर्शित या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये झाले आहे.

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरच 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीमचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात प्रियंकासोबत फरहान अख्तर, झायरा वसिम हे कलाकारही मुख्य भूमिका साकारत आहेत. सोनाली बोस या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 

तरण आदर्शने ट्विटरवर 'द स्काय इज पिंक' चित्रपटातील कलाकारांचे फोटो शेअर करीत लिहिले की, प्रियंका चोप्रा, फरहान अख्तर व जायरा वसीम यांचा आगामी चित्रपट 'द स्काय इज पिंक'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सोनाली बोस करत आहेत. तर आरएसवीपी व रॉय कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'द स्काय इज पिंक' चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते.

या चित्रपटात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये झाले आहे. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्राफरहान अख्तरझायरा वसीम