Join us

देसी गर्ल प्रियंका चोप्राला दुखापत, चाहत्यांना वाटतेय तिची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 16:16 IST

प्रियंका चोप्राने नुकतेच 'द स्काई इज पिंक' शूटिंग संपली आहे. रॅपअप पार्टीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. ज्यात प्रियांकाच्या गुडघ्याला निक कॅप घातलेली दिसतेय.

ठळक मुद्दे'द स्काय इज पिंक' सिनेमाची रॅपअप पार्टी झाली फोटोंमध्ये प्रियंकाने पायाला बँडेज लावली दिसतेय

प्रियंका चोप्राने नुकतेच 'द स्काई इज पिंक' शूटिंग संपली आहे. रॅपअप पार्टीचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. ज्यात प्रियांकाच्या गुडघ्याला निक कॅप घातलेली दिसतेय. शूटिंग संपल्यानंतर रॅपअप पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. या फोटोंमध्ये प्रियंकाने पायाला बँडेज लावली दिसतेय. 

'द स्काई इज पिंक'च्या टीम सोबतचा फोटो शेअर करुन एक इमोशनल पोस्ट प्रियंकाने लिहिली आहे. यात तिने लिहिले की, शूटिंगचा शेवटचा दिवस खूर इमोशनल होता. क्रू, को-स्टार आणि निर्माता सगळ्यांचे आभार.

हा सिनेमा नेहमीच माझ्या मनाच्याजवळ राहिलं. मी हा सिनेमा सिद्धार्थ रॉय कपूर माझा मित्र आहे म्हणून नाही केला तर सिनेमा एका खऱ्या घटनेवर आधारित आहे आणि याच्या माध्यमातून मला काही तरी वेगळं करायला मिळेल म्हणून केला. या पोस्टमध्ये प्रियंका फरहानचे आभार मानायला देखील विसरली नाही. प्रियंका म्हणाली, मला फरहानसारख्या अप्रतिम सहकलाकारासोबत पुन्हा-पुन्हा काम करायला आवडेल.

      

'द स्काय इज पिंक' चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. या चित्रपटाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते.या चित्रपटात आयशाची भूमिका झायरा वसीमने साकारली आहे. फरहान अख्तरप्रियंका चोप्रा आयशाच्या आई वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्राफरहान अख्तर