इन्कम टॅक्स विभागाने प्रियांकाच्या सर्व गोष्टींचे खंडन करताना प्रियांकाला यावर टॅक्स भरायला सांगितले आहे. इन्कम टॅक्स विभागाचे म्हणणे आहे. प्रियांकाची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता यावर प्रियांका यावर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरले. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका बॉलिवूडपासून दूर आहे. ‘जय गंगाजल’नंतर तिने एकही बॉलिवूड चित्रपट साईन केलेला नाही. लवकरच प्रियांकाचे आणखी दोन हॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत. ‘क्वांटिको’च्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती. प्रियांकाची ही भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. आमिरच्या सैल्यूट' चित्रपटाचा भाग बनू शकते. यात आमीर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. ALSO READ : आॅस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज आहे प्रियांका चोप्रा! नामांकनाची करणार घोषणा!!Priyanka Chopra shows luxury watch and sedan as gifts, ordered to pay tax https://t.co/JdNve1GiTh via @TOIEntertainpic.twitter.com/X4ThNxXfdy— Times of India (@timesofindia) January 25, 2018
प्रियांका चोप्राला इन्कम टॅक्स विभागाचे कर भरण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:12 IST
प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या‘क्वांटिको’ सीजन 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर तिच्या शूटिंग दरम्यानचे फोटो प्रियांका ...
प्रियांका चोप्राला इन्कम टॅक्स विभागाचे कर भरण्याचे आदेश
प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या‘क्वांटिको’ सीजन 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर तिच्या शूटिंग दरम्यानचे फोटो प्रियांका शेअर करत असते. याचदरम्यान प्रियांकाशी संबंधीत एक इन्कम टॅक्सची बातमीसमोर आली आहे. महागड्या वस्तूंवरचे टॅक्स भरण्याचे आदेश आयकर विभागाने दिले आहेत. मात्र प्रियांकाने हे आपल्याला गिफ्ट म्हणून मिळाल्याचे सांगितले आहे. लग्जरी कार आणि घड्याळांचा समावेश यात आहे. तर इन्कम टॅक्स विभागाने भारतीय नियमानुसार गिफ्ट मिळाल्या सामानावर तिला टॅक्स भरावे लागले. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तनुसार चार वर्षांपूर्वी प्रियांकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला होता. त्यावेळी स्पष्टीकरण देताना लग्जरी कार आणि घड्याळ गिफ्ट म्हणून देण्यात आल्याचे तिने सांगितले होते. 40 लाख रुपयांचे LVMH-TAG चे घड्याळ आणि 27 लाख रुपयांची टोयोटा प्रियस Toyota Prius कार गिफ्ट म्हणून दिल्याचे प्रियांकाने सांगितले होते.