Join us  

प्रियंका चोप्राच्या डॉगीचा थाट...! मॅचिंग कपड्यांत असे केले फोटोसेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 11:24 AM

सध्या पीसीचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे...

ठळक मुद्देप्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे.

प्रियंका चोप्राचा ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमात प्रियंका व राजकुमार राव लीड रोलमध्ये आहेत. सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे आणि आता एक फोटो शेअर करत प्रियंकाही चर्चेत आली आहे. होय, प्रियंकाने नुकताच तिचा पेट डॉग डियानासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात प्रियंका व डियाना दोघेही मॅचिंग ड्रेसमध्ये दिसत आहेत.

‘व्हाईट टायगर व त्याचा बच्चा,’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. एकंदर काय, तर हौस ती हौस आणि सिनेमाचे प्रमोशन ते प्रमोशनही असा प्रियंकाचा दुहेरी उद्देश सार्थ झाला आहे. सध्या पीसीचा हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती.

प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले होते. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. प्रियंका पतीपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. शिवाय प्रॉपर्टीच्या बाबतीतही ती निकच्या कितीतरी पुढे आहे. प्रियंका सुमारे 200 कोटींच्या प्रॉपटीर्ची मालकीन आहे. तर निककडे 175 कोटींची प्रॉपर्टी आहे. प्रियंका आणि निक दोघांनाही लक्झरी लाईफ आवडते. दोघांकडेही महागड्या गाड्या आहेत, अलिशान बंगले आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रा