न्यू यॉर्कच्या रस्त्यावर हातात हात घालून कोणासोबत फिरत आहे प्रियंका चोपडा? तिला तिचा राजकुमार तर मिळाला नसेल ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:15 IST
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या न्यू यॉर्कला असून, एका अनोळखी व्यक्तीच्या हातात हात घालून न्यू यॉर्कच्या रस्त्यावर फिरताना ...
न्यू यॉर्कच्या रस्त्यावर हातात हात घालून कोणासोबत फिरत आहे प्रियंका चोपडा? तिला तिचा राजकुमार तर मिळाला नसेल ना?
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या न्यू यॉर्कला असून, एका अनोळखी व्यक्तीच्या हातात हात घालून न्यू यॉर्कच्या रस्त्यावर फिरताना ती बघावयास मिळाली. मात्र तुम्ही जो विचार करीत आहात तसे काहीही नसून, हा अनोळखी व्यक्ती दुसरा-तिसरा कोणीही नसून, ‘क्वांटिको’मधील तिचा को-स्टार रसेल टोवी आहे. रसेलसोबत प्रियंकाची चांगली मैत्री असून, तिला नेहमीच त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडते. त्यामुळेच रसेलने गेल्या बुधवारी सेलिब्रेट केलेल्या त्याच्या वाढदिवशी प्रियंका स्पेशल गेस्ट म्हणून उपस्थित होती. प्रियंकानेही रसेलच्या बर्थ डेमध्ये सहभागी होत तो दिवस अधिक स्पेशल करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती प्रियंका नव्हे तर स्वत: बर्थ डे बॉय रसेलने दिली. त्याने एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो प्रियंकाचे आभार मानताना दिसत आहे. दरम्यान, प्रियंकासाठी हे वर्ष खूपच स्पेशल राहिले आहे. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या तिसºया सीजनची शूटिंग करीत आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक झाली आहे. त्याचबरोबर तिला दोन हॉलिवूड चित्रपटांची आॅफरही लागली आहे. प्रियंकाने ‘इसिंट इट रोमॅण्टिक’ आणि ‘अ किड लाइक जेक’ हे दोन चित्रपट साइन केले आहेत. लवकरच ती या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने तिच्या ‘क्वांटिको-३’साठी एक नवा लूक धारण केला आहे. याविषयी प्रियंकाने सांगितले की, ‘या शोसाठी मला माझे लांब केस कापावे लागले.’ याबाबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘बाय बाय लॉन्ग हेअर... सीजन-३ मध्ये एलेक्स पॅरिशचा लूक कसा असेल? हे तुम्हाला लवकरच समजणार आहे. दरम्यान, प्रियंका राकेश ओम प्रकाश यांच्या ‘सॅल्युट’ या चित्रपटात आमिर खानसोबत बघावयास मिळू शकते.