Join us

आॅस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी सज्ज आहे प्रियांका चोप्रा! नामांकनाची करणार घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 10:43 IST

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. होय, यंदाच्या म्हणजेच २०१८ ...

बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा हिच्या चाहत्यांसाठी एक अभिमानाची बातमी आहे. होय, यंदाच्या म्हणजेच २०१८ च्या आॅस्कर अवार्ड सोहळ्यात प्रियांका खास आकर्षण असणार आहे. या सोहळ्यात प्रियांका प्रतिष्ठित आॅस्कर पुरस्काराची नामांकने जाहिर करताना दिसेल. द अ‍ॅकेडमीच्या अधिकृत अकाऊंटवर प्रियांकाचे ‘बिहाईन्ड द सीन’चे काही फोटो शेअर केले गेले आहेत. या फोटोत प्रियांका एक ‘बिहाईन्ड द सीन’ शूट करताना दिसतेय. या फोटोमध्ये पीसीने ब्लॅक पँट आणि सिल्व्हर टॉप घातलेले आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे.भारतीय प्रमाण वेळेनुसार, मंगळवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटाला ९० व्या आॅस्कर नामांकनाची घोषणा होणार आहे. यावेळी रोजेरिया डॉसन, रिबेल विल्सन आणि मिशेल राड्रिग हे हॉलिवूडचे दिग्गज प्रियांकासोबत असतील.आॅस्कर नामांकनाची घोषणा करण्याचा मान कायम हॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील कलाकारांना दिला गेला आहे. त्यामुळे यंदा प्रियांकाला हा मान मिळावा, ही तिची मोठी उपलब्धी मानली जात आहे.ALSO READ : भररस्त्यात ‘या’ व्यक्तीला किस करताना दिसली प्रियांका चोपडा, फोटो व्हायरल!गतवर्षी प्रियांका आॅस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसली होती. सध्या प्रियांका अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको3’मध्ये बिझी आहे. शूटींगदरम्यान ती न्यूयॉर्कच्या रस्त्यावर को-स्टार एलन पोवेल याला किस करताना दिसली होती. देसी गर्लच्या या रोमॅन्टिक शूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शूटींगवेळी प्रियांका आणि एलन पोवेल यांच्यात कमालीची केमिस्ट्री दिसून आली होती. ‘क्वांटिको’च्या दोन्ही सीझनमध्ये प्रियांका एलेक्स पारिशची भूमिका साकारताना दिसली होती.  प्रियांकाची  ही भूमिका जगभरातील लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.  याच भूमिकेने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. कोट्यवधी लोकांची मने तिने जिंकलीत. यानंतर एकापाठोपाठ एक हॉलिवूड सिनेमेही तिला मिळालेत. अलीकडे प्रियांकाचा ‘बेवॉच’ हा हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला. अलीकडे प्रियांकाने आणखी तीन हॉलिवूड सिनेमे हातावेगळे केले.  तूर्तास प्रियांकाकडे एकही बॉलिवूड प्रोजेक्ट नाही. पण पीसीचे भारतीय चाहते तिला पाहण्यास आतूर आहे. मध्यंतरी प्रियांका पी.टी. उषा हिच्या बायोपिकमध्ये झळणार अशी बातमी होती. अर्थात प्रियांकाने या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. प्रियांका शेवटची ‘बाजीराव मस्तानी’मध्ये दिसली होती. तेव्हापासून ती हॉलिवूडमध्ये व्यस्त आहे.