Join us  

Priyanka Chopra Nick Jonas Wedding: प्रियांका व निकची लग्नस्थळी होणार अशी ग्रॅण्ड एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 12:53 PM

प्रियांका चोप्रा येत्या २-३ डिसेंबरला स्वत:पेक्षा १०वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक खास बातमी आहे.

ठळक मुद्दे२९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी  पार पडणार आहे.

प्रियांका चोप्रा येत्या २-३ डिसेंबरला स्वत:पेक्षा १०वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक खास बातमी आहे. होय, वेडिंग वेन्यूपर्यंत प्रियांका व निक दोघेही हेलिकॉप्टरने पोहोचणार आहेत. लग्नाचे वºहाडीही जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरनेच थेट वेडिंग मेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे उमेद पॅलेसमध्ये एक हेलिपॅड उभारण्यात येत आहे. मेवाड हेलिकॉप्टर्स सर्व्हिसेसने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. २९ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबरसाठी एक चॉपर बुक करण्यात आल्याचे या सर्व्हिसेसने सांगितले. त्यामुळे प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहत्यांना ताटकळत राहावे लागणार आहे. निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय.  २९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील. १ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी  पार पडणार आहे.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास