Join us  

प्रियंका चोप्राने घातले चोरीचे कपडे, विश्वात बसत नसेल तर हा घ्या पुरावा

By रूपाली मुधोळकर | Published: October 23, 2020 12:16 PM

देसी गर्लने खुद्द दिली कबुली

ठळक मुद्दे प्रियंकाची ‘अनफिनिश्ड’ही बायोग्राफी नुकतीच प्रकाशित झाली. तिचे हे प्रकाशित झाले आणि केवळ १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरले.

प्रियंका चोप्रा सध्या जर्मनीत मुक्कामाला आहे. या मुक्कामात प्रियंकाने एक मजेशीर चॅलेंज स्वीकारले आणि ते पूर्ण केले. या चॅलेंजदरम्यानचा एक मजेशीर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चोरीचे कपडे घालत असल्याची कबुली तिने यानिमित्ताने दिली आहे.होय, प्रियंका सर्रास चोरीचे कपडे घातले.

आता इतकी मोठी ग्लोबल स्टार चोरीचे कपडे घालते म्हटल्यावर अनेकांना विचित्र वाटेल. पण हे चोरीचे कपडे कोणाचे तर पती निक जोनासचे. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोतही तिने निकचेच कपडे घातले आहेत. ‘निक जोनास तुझे कपडे चोरताना मजा येते,’ असे तिने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

‘मॅट्रिक्स 4’च्या शूटींगमध्ये बिझी  देसी गर्ल प्रियंका सध्या आपल्या नव्या फिल्मच्या शूटिंगसाठी जर्मलीना गेली आहे. प्रियंका चोप्रा तिच्या मॅट्रिक्स 4 या हॉलिवूडपटाच्या शूटिंगसाठी जर्मनीला गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बर्लिनच्या गल्लांमधून रपेट मारतानाचे फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत तिचा कुत्राही आहे.  मॅट्रिक्स 4 हा सायन्स फिक्शन मूव्ही आहे. यात प्रियंकाची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. भूमिका अत्यंत दमदार आहे. मॅट्रिक्स 4मध्ये तिच्यासोबत कियानू रिव्ह्ज , कॅरी अ‍ॅनी मॉस  झळकणार आहेत. डिसेंबर 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रियंका चोप्रा लवकरच राजकुमार रावसोबत ह्यद व्हाईट टायगरह्ण या सिनेमात दिसणार आहे. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आणि या फर्स्ट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

द व्हाईट टायगरगेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा आहे. प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.  यात प्रियंका, राजकुमार रावए आदर्श गौरव एकत्र दिसणार आहेत.  ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या पहिल्याच कादंबरीसाठी अरविंद अडिगा यांना बुकर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

नेटफ्लिक्स मुकूल देवरा यांच्यासोबत मिळून हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. य्प्रियंकाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून या सिनेमाशी जुळलेली आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. शूटींगच्या अखेरच्या दिवसाचा फोटोही प्रियंकाने शेअर केला होता.

अशी आहे कथारिपोर्टनुसार, सिनेमात प्रियंका पिंकी मॅडमची भूमिका साकारताना दिसणार आहे. एका गावात चहाच्या दुकानात काम करणारा तरूण एका मोठ्या शहरातील यशस्वी उद्योजक बनतो. मात्र या महत्त्वाकांक्षी तरूणाला याची मोठी किंमत चुकवावी लागते. हत्या, प्रेम, विश्वासघात असे अनेक पैलू या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.

१२ तासात नंबर वन ठरले ‘अनफिनिश्ड’

ग्लोबल आयकॉन अभिनेत्री प्रियंकाची ‘अनफिनिश्ड’ही बायोग्राफी नुकतीच प्रकाशित झाली. तिचे हे प्रकाशित झाले आणि केवळ १२ तासात अमेरिकेतील बेस्ट सेलर पुस्तक ठरले. प्रियंकाने चोप्राने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचे पुस्तक बेस्ट सेलर ठरल्याची माहिती दिली होती.  

प्रियंका चोप्रा-राजकुमार रावच्या ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात का? 

म्हणून कोरोना काळात प्रियंका चोप्रा घेतेय निकची विशेष काळजी, हा आजार आहे त्याला कारणीभूत

टॅग्स :प्रियंका चोप्रा