Join us  

Priyanka Chopra Daughter: 100 दिवसानंतर रुग्णालयातून घरी परतली प्रियंकाची मुलगी, पहिला फोटो आला समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 8:44 AM

Priyanka Chopra Daughter: मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये पती निक जोनासही तिच्यासोबत दिसत आहे.

Priyanka Chopra Daughter: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra)  नुकतीच आई झाली आहे. प्रियंकाने स्वतः सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. तेव्हापासून तिच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण प्रियांकाने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.

प्रियांकाने शेअर केला मुलीचा फोटोमदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने रात्री उशिरा तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुलीचा चेहरा नीट दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही(Nick Jonas)  तिच्यासोबत दिसत आहे. प्रियांका तिच्या बाळाला मिठी मारत आहे आणि निक त्याच्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहे.

100 दिवसांनी मुलगी घरी परतलीहा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने लिहिले की, मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून रोलर कोस्टर राईडवर बसलो होतो. रुग्णालयात 100 हून अधिक दिवस घालवल्यानंतर आमची चिमुकली घरी परतली आहे. आम्ही प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि लॉस एंजेलिस येथील तज्ञांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी प्रत्येक पायरीवर निस्वार्थपणे आम्हाला मदत केली. आमचा पुढचा प्रवास आता सुरू होत आहे आणि आमचे बाळ खरोखरच सुखरुप आहे. 

हे आहे मुलीचे नाव या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राने आपल्या मुलीला एमएम म्हटले आहे, ज्याचा अर्थ मालती मेरी असू शकतो. अलीकडेच अशी बातमी आली होती की, प्रियांका आणि निकच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास आहे. आता प्रियंकाने पोस्टमधून याला दुजोरा दिल्याचे दिसते. प्रियांका चोप्राच्या आईचे नाव मधु मालती चोप्रा आहे. प्रियांकाने आपल्या आईच्या नावावरून प्रेरित होऊन आपल्या मुलीचे नाव मालती ठेवले. प्रियांका हिंदू आणि निक ख्रिश्चन असल्याने मुलीच्या नावासोबत मेरी जोडले आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास