Join us

प्रियांका चोप्रा सायबर क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:47 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सायबर स्पेसवर सर्वाधिक चर्चेत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एका आंतरराष्ट्रीय टीव्ही शोमधील अमेरिकन थ्रीलर ...

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सायबर स्पेसवर सर्वाधिक चर्चेत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे. एका आंतरराष्ट्रीय टीव्ही शोमधील अमेरिकन थ्रीलर सिरीज क्वॉन्टिकोमुळे प्रियांका चोप्राने आलिया भटला मागे टाकले आहे.इंटरनेटवर काही लोक अनेक चांगली-वाईट मते नोंदवितात. मात्र, खर्‍या अर्थाने नेमकी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न सर्वेक्षणातून केल्याचे इंटेलने म्हटलेआहे. इंटेल सीक्युरिटी मोस्ट सेन्सेशनल सेलिब्रिटी सर्व्हेमध्ये भारतीय सायबर स्पेसवर प्रियांका चोप्रा सर्वाधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे. श्रद्धा कपूर, कपील शर्मा, ज्ॉकलीन फर्नांडीस आणि कंगना रानावत यांना मागे टाकून प्रियांका टॉपवर आहे. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या संशोधनात पॉप्युलर कल्चरमधील प्रसिद्ध व्यक्तींच्या सर्वेतून हे स्पष्ट झाले आहे.इंटरनेटवर प्रियांका चोप्राच सगळ्य़ात जास्त चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. अँवॉर्ड शो, टीव्ही शो, फिल्म म्युझिक लॉन्चिंग, सेलिब्रिटी ब्रेकअप्स याविषयी अनेकजण इंटरनेटवर आपली मते व्यक्त करतात. यात ग्राहकांचा इंटरेस्ट असतो.त्यामुळे त्यातून योग्य निष्कर्ष काढता येत नसला तरी या सर्वेक्षणात प्रियांका चोप्रा सर्वाधिक चर्चेत असल्याचे दिसते.