प्रियांका चोप्राने स्वीकारलेयं ८० दत्तक मुलांचे पालकत्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 16:34 IST
ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्राला काल रविवारी मानद डॉक्टरेटने गौरविण्यात आले. बरेली विद्यापीठाने प्रियांकाला डॉक्टरेट देऊन गौरविले. खरे तर ...
प्रियांका चोप्राने स्वीकारलेयं ८० दत्तक मुलांचे पालकत्व!
ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्राला काल रविवारी मानद डॉक्टरेटने गौरविण्यात आले. बरेली विद्यापीठाने प्रियांकाला डॉक्टरेट देऊन गौरविले. खरे तर प्रियांका या सोहळ्याला व्यक्तिश: हजर राहणार होती. बरेलीसाठी रवाना होण्यासाठी ती निघालीही होती. पण विमानाच्या प्रतीक्षेत प्रियांकाला अनेक तास मुंबई विमानतळावर ताटकळत राहावे लागले आणि तिकडे बरेलीतील कार्यक्रमाची वेळ टळली.दाट धुक्यामुळे प्रियांकाच्या विमानाचा खोळंबा झाला आणि डॉक्टरेट उपाधी स्वीकारण्यासाठी व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे प्रियांकांचा मनसुबाही फसला. याचे दु:ख तर आहेच. प्रियांकाने सोशल मीडियावर ते बोलूनही दाखवले आहे. बरेली आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने दिलेली मानद डॉक्टरेट स्वीकारायला मी व्यक्तिश: हजर राहू शकले नाही. आम्ही विमानतळावर एटीसीकडून हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षाच करत राहिलो. माझ्या टीमने बरेलीत पोहोचण्याच्या सर्व पर्यायांचा शोध घेतला. पण दाट धुक्यांमुळे सगळा बेत फसला. तेथील जुन्या मित्रांना व नातेवाईकांना भेटण्याची इच्छाही अधुरीच राहिली, असे प्रियांकाने सोशल मीडियावर लिहिले आहे. सामाजिक कार्यातील योगदानासाठी प्रियांकाला मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. आता प्रियांकाने असे काय सामाजिक कार्य केले, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर स्वत: प्रियांकाने आपल्या सामाजिक कार्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली आहे. प्रियांका युनिसेफची जागतिक सद्भावना दूत आहे, हे तुम्हाला माहित आहेच. या नात्याने प्रियांका सध्या जगभरात फिरून मुलांच्या अधिकारांबद्दल जनजागृती करतेय. बालविवाह, हुंडा प्रथा, शिक्षण, स्वच्छता अशाा अनेक मुद्यांवर ती काम करतेय. याशिवाय प्रियांकाचे एक फाऊंडेशन आहे. या फाऊंडेशनने ८० मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च प्रियांकाने उचलला आहे. या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रियांका स्वत: लक्ष ठेवून असते. या सर्व मुलांचे रिपोर्ट्स कार्ड प्रियांकाकडे येतात. प्रियांकाच्या मते, देशातील समस्या दूर करणे कुण्या एकट्याची जबाबदारी नाही तर ती सर्वांची जबाबदारी आहे.