Join us  

बॉलिवूडवरही चालली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरची जादू! डेब्यूआधीच मिळाला दुसरा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 6:00 AM

‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. साहजिकच प्रियाचे चाहते उत्सुक आहेत. आता चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी आणखी एक बातमी आहे.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ‘श्रीदेवी बंगलो’चा टीजर प्रदर्शित झाला होता. पण टीजरनंतर हा चित्रपट वादात सापडला होता.

‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. साहजिकच प्रियाचे चाहते उत्सुक आहेत. आता चाहत्यांची उत्सुकता वाढवणारी आणखी एक बातमी आहे. होय, ‘श्रीदेवी बंगलो’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रियाच्या हाती एक नवा सिनेमा लागला आहे.

या चित्रपटाचे नाव आहे, ‘लव्ह हॅकर्स’. मयंक श्रीवास्तव हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपटात प्रिया मुख्य भूमिकेत दिसेल. हॅकर्स या शब्दावरून हा एक सायबर क्राईमवर आधारित आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘श्रीदेवी बंगलो’चे शूटींग संपताच प्रिया या चित्रपटात बिझी होणार आहे. खुद्द प्रियाने या नव्या चित्रपटाबद्दल माहिती दिली. माझा हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित आहे. प्रतिभेच्या जोरावर यश मिळवणारी आणि याचदरम्यान एका संकटात सापडणाºया मुलीची भूमिका मी यात साकारणार आहे, असे प्रियाने सांगितले. 

काही दिवसांपूर्वी ‘श्रीदेवी बंगलो’चा टीजर प्रदर्शित झाला होता. पण टीजरनंतर हा चित्रपट वादात सापडला होता.   श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी बंगलो’चे दिग्दर्शक प्रशांत मंबुली यांना कायदेशीर नोटीस बजावले होते.

टीजर पाहिल्यानंतर प्रिया प्रकाशचा हा आगामी चित्रपट सुपरस्टार श्रीदेवी आणि त्यांच्या अपघाती मृत्यूवर आधारित असल्याचे मानले गेले होते. या पार्श्वभूमीवर बोनी कपूर यांनी ‘श्रीदेवी बंगलो’च्या दिग्दर्शकांना नोटीस बजावले होते. पण दिग्दर्शकांनी हा चित्रपट श्रीदेवींच्या आयुष्यावर आधारित असल्याचा इन्कार केला होता. माझा चित्रपट एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट आहे. श्रीदेवी एक कॉमन नाव आहे, असे त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :प्रिया वारियर