प्रेग्नेंट सोहा अली खान अडचणीत! दाखल होणार एफआयआर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2017 15:56 IST
सैफ अली खानची लाडकी बहीण सोहा अली खान हिच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. सोहा व तिचा ...
प्रेग्नेंट सोहा अली खान अडचणीत! दाखल होणार एफआयआर!!
सैफ अली खानची लाडकी बहीण सोहा अली खान हिच्या घरी लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. सोहा व तिचा पती कुणाल खेमू आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा करत आहेत. पण या आनंदावर विरजण पडण्याची चिन्हे आहेत. होय, हरियाणाच्या लोकायुक्तांनी सोहा अली खानविरूद्ध आर्म्स लायसेन्स प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. सोहा अली खानला १९९६ मध्ये शस्त्रास्त्र परवाना जारी करण्यात आला होता. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय चुकीचे. तर तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोहाला हा शस्त्रास्त्र परवाना जारी झाला, तेव्हा तिचे वय होते १८ वर्षे एक महिना होते. कायद्यानुसार, शस्त्रास्त्र परवाना बाळगण्याचे कायदेशीर वय २१ वर्षे आहे. त्यामुळे सोहा अडचणीत सापडली आहे. सोहाने अवैधरित्या शस्त्रास्त्र परवाना बनवल्याची तक्रार लोकायुक्तांकडे २०१६ मध्ये आली होती. पिपल्स फॉर अॅनिमलचे अध्यक्ष नरेश कादियान यांनी ही तक्रार दाखल केली होती.ALSO READ : प्रेग्नंट आहे सोहा अली खान; पतौडी परिवारात पुन्हा येणार आनंदाचे क्षण!काळवीट शिकार प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सोहाचे हे बिंग फुटले होते. सोहाचे वडील पिता नवाब मंसूर अली खान पतौडी यांनी सोहाच्या नावावर नोंदणी झालेल्या रायफलचा वापर २००६ मध्ये एका काळवीटाच्या शिकारीसाठी केला होता, असा आरोप आहे. ही रायफल जप्त करण्यात आली होती. पण ही रायफल सोहाच्याच नावावर जारी करण्यात आली होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही रायफल आधी सुल्तानच्या नावावर जारी करण्यात आली होती. यानंतर तिला सोहाच्या नावावर रजिस्टर करण्यात आले होते. एकंदर काय, तर हे प्रकरण सोहाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.