Join us  

इमरान हाश्मीचा आगामी सिनेमा 'चीट इंडिया'चा पोस्टर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:30 PM

बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीने आगामी चित्रपट 'चीट इंडिया'चे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे.

ठळक मुद्देइमरान हाश्मी दिसणार 'चीट इंडिया'मध्ये मुख्य भूमिकेत 'चीट इंडिया' चित्रपट शिक्षण भ्रष्टाचारावर आधारीत

बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मी २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'बादशाहो'मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या सिनेमानंतर आता तो 'चीट इंडिया' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'चीट इंडिया'च्या पोस्टरमध्ये इमरान हाश्मीने चश्मा घातला असून त्याच्या चेहऱ्यावर स्टुडंट अॅडमिट कार्ड व नोटांची झलक पाहायला मिळते आहे.चित्रपटाच्या पोस्टरवर चित्रपटाची टॅगलाईन लिहिली आहे की, नक्कलमध्येही अक्कल आहे.

इमरान हाश्मीने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले होते की, ''चीट इंडिया'चे शीर्षक व स्क्रीप्ट खूप शक्तीशाली आहे. आतापर्यंत वाचलेली मी आकर्षक व उत्साही कथेपैकी एक स्क्रीप्ट आहे. 'शौमिल सेनच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'चीट इंडिया' चित्रपट शिक्षण भ्रष्टाचारावर आधारीत आहे. या चित्रपटाचा टीझर १६ नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी व्यतिरिक्त श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :इमरान हाश्मी