Join us  

पूनम पांडेने सांगितलं 'लॉकअप' शोमध्ये टॉपलेस होण्याच कारण, ज्यामुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 2:49 PM

Poonam Pandey : पूनम पांडे म्हणाली की, लॉकअपने मला बालपणीची आठवण दिली. पैसे नसल्याने टेलरिंगपासून ते पापड लाटण्यापासूनची सगळी कामे केली.

कंगना रणौतचा रिअॅलिटी शो लॉकअपमध्ये पूनम पांडे (Poonam Pandey) सर्वात चर्चेत राहणारी स्पर्धकांपैकी एक होत. फॅन्सचं अटेंशन मिळवण्यासाठी पूनमने यादरम्यान तिची 'आयकॉनिक स्ट्रॅटेजी' सुद्धा वापरली होती. ती लॉकअपमध्ये तिच्या भूमिकेला मिळालेल्या रिस्पॉन्समुळे आनंदी आहे आणि म्हणाली की, या शोमुळे लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

पूनम पांडे म्हणाली की, लॉकअपने मला बालपणीची आठवण दिली. पैसे नसल्याने टेलरिंगपासून ते पापड लाटण्यापासूनची सगळी कामे केली. ते सगळं डोळ्यांसमोर आलं.  आम्ही सगळे स्पर्धक बाहेर आल्यावर एकमेकांच्या संपर्कात आहोत. आम्ही लॉकअप नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्याचा प्लान केला आहे. मी सर्वांशी बोलते. पूनमला या गोष्टीचं वाईटही वाटतं की, ती मुन्नवरपेक्षा चांगलं खेळू शकली नाही, नाही तर ती विनर ठरली असती. 

ती म्हणाली की, या शोमुळे लोकांच्या तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आता मुली मला येऊन भेटतात.  मला किस करतात, माझ्याशी बोलतात. हेच मला नेहमी हवं होतं. मला त्यांना सांगायचं होतं की, मी सुद्धा त्यांच्यासारखी घरगुती आणि सिंपल आहे. मी खूप स्ट्रगल केला आहे आणि गरिबी पाहिली आहे. शाळेत असताना फी मी स्वत: भरत होते. 

पूनम म्हणाली की, शोमध्ये टी-शर्ट काढणं ही मतं मिळवण्याची स्ट्रॅटेजी होती. ती म्हणाली की, जेव्हा मी बॉटमला आली तेव्हा मला कळत नव्हतं की, मी काय करायला हवं, ज्याने फॅन्स मला मतं देतील. टीशर्ट काढण्याची आयडिया हिट झाली. मला मतं मिळाली. मी जो विचार केला वाईट असो वा चांगला तो कामी आला.

पूनमने पीरियड्सबाबतच्या समस्येबाबतही सांगितलं. ती म्हणाली की, ही समस्या केवळ तिलाच नाही तर शोमधील सर्वच मुलींना येत होती. सर्व मुलींना औषधं घ्यावी लागत होती. तिथे सूर्यप्रकाश अजिबात नव्हता. त्यामुळे आम्ही सगळेच तणावात होतो. आमची बॅग घेतली गेली होती.  

टॅग्स :पूनम पांडेलॉक अप