Join us  

‘हाऊसफुल4’च्या गाण्याने केली पूजा हेगडेची दमछाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 11:19 AM

‘हाऊसफुल4’ या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा आणि पूजा हेगडे यांची वर्णी लागली आहे. पण या सगळ्यात अभिनेत्री पूजा हेगडे मात्र हिची मात्र चांगली तारेवरची कसरत होतेय.

बायोपिकप्रमाणेच सध्या बॉलिवूडमध्ये फ्रेंचाईजी व सीरिजचा धडका सुरु आहे. एक भाग हिट होतो ना होतो, तोच पुढच्या भागाची घोषणा होते. ८ वर्षांपूर्वी आलेला ‘हाऊसफुल’ हा सुद्धा असाच एक चित्रपट. हा चित्रपट लोकांनी इतका डोक्यावर घेतला होता की, आता या चित्रपटाचा चौथा भाग अर्थात ‘हाऊसफुल4’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. साजिद नाडियाडवालाच्या या सुपरहिट फ्रेचाईजीच्या चौथ्या भागाचे शूटींग लंडनमध्ये कधीचेच सुरु झाले आहे. साजिद खान दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा आणि पूजा हेगडे यांची वर्णी लागली आहे. पण या सगळ्यात अभिनेत्री पूजा हेगडे मात्र हिची मात्र चांगली तारेवरची कसरत होतेय. याचे कारण म्हणजे, पूजा सध्या प्रचंड बिझी आहे.

‘हाऊसफुल4’मध्ये पूजा एका डान्स नंबरवर थिरकताना दिसणार आहे. खरे तर हे या चित्रपटातील सर्वात मोठे गाणे आहे. साहजिकचं त्याची तयारीही मोठी. पण ही तयारी करताना पूजाला बरीच धावपळ करावी लागली. एकाच वेळी अनेक प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने पूजाला या तयारीसाठी फार कमी वेळ देता आला. आधी शूटींगच्या निमित्ताने डेहराडून ते हैदराबाद अशा तिच्या फेऱ्या सुरू होत्या. अशातच फराह खान कोरिओग्राफ करणार असलेल्या या गाण्याची डान्स रिहर्सल तिला करायची होती. कारण यानंतर लगेच ‘हाऊसफुल4’ची टीम लंडनसाठी रवाना होणार होती. मग पूजाने कसाबसा एका दिवसाचा वेळ काढला आणि ती मुंबईला पोहोचली आणि या एक दिवसांत तिने या गाण्याची तयारी केली. आता ही तयारी कशी झाली, ते आपण चित्रपटात बघूच.

 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित असणार आहे. हा चित्रपट पुढच्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हाउसफुल- 3’ 2016 मध्ये रिलीज झाली होता. या चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा अधिक गल्ला जमविला होता. त्यामुळे चौथा भागही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरेल, असा निर्मात्यांना ठाम विश्वास आहे. आतापर्यंत या सिरीजचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, सर्वच सुपरहिट ठरले आहेत. आता चौथा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :पूजा हेगडे