Join us

पूजा भट्ट पुन्हा येतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 01:23 IST

बॉलिवूडमधील एकेकाळची अभिनेत्री पूजा भट्ट तब्बल १८ वर्षांनतर अभिनयात पुनरागमन करीत आहे. पिता महेश भट्ट यांच्या लेखणीतून उतरलेल्या चित्रपटात ...

बॉलिवूडमधील एकेकाळची अभिनेत्री पूजा भट्ट तब्बल १८ वर्षांनतर अभिनयात पुनरागमन करीत आहे. पिता महेश भट्ट यांच्या लेखणीतून उतरलेल्या चित्रपटात ती दिसणार आहे. सध्या ४३ वर्षांची असलेल्या पूजाने १९८९ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित ‘डॅडी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पित्याला दारुच्या व्यसनातून केवळ प्रेमाच्या ताकदीने सोडवण्याचा प्रयत्न करणाºया मुलीची कथा या चित्रपटात होती.पूजा म्हणाली, नवीन चित्रपट हा ‘डॅडी’च्या च्या कथानकाच्या अगदी उलटा असेल. या चित्रपटात महत्वाकांक्षी महिलेची कथा आहे. तर तिची मुलगी पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागते. ही महिला वैफल्यग्रस्त असते. ती दारूच्या आहारी जाते. या दोघांच्या नात्यावर हा चित्रपट आहे.पूजाने ‘दिल है की मानता नही’, ‘सडक’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’ आदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या. १९९८ मध्ये तिने महेश भट्ट दिग्दर्शित ‘जख्म’ चित्रपटात भूमिका केली होती. ती म्म्हणाली, माझे वडील दिग्दर्शनातून निवृत्त झाल्यावर मीही अभिनय बंद केला. वडिलांनी लिहिलेली कथा मला आवडली आणि मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला.त्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. आम्ही योग्य दिग्दर्शकाच्या शोधात आहोत. कारण माझे वडील यापुढे दिग्दर्शन करणार नाहीत. सध्या पूजा ही ‘जिस्म ३’ दिग्दर्शित करण्यात व्यस्त आहे.