Join us  

उद्या मृत्यू आला तर...? म्हणत पूजा बेदीने शेअर केला गोवा व्हॅकेशनचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 1:42 PM

ना जगाची, ना कोरोनाची भीती...! पूजा बेदी सध्या तिच्या होणा-या पतीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेतेय.

ठळक मुद्देपूजाने फेब्रुवारी 2019 मध्ये मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला. तो तिचा शाळेतील मित्र असून ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. 

कोरोनाने कहर केला असताना बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी मुंबईबाहेर सुट्टी घालवत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) यापैकीच एक. पूजा बेदी सध्या तिच्या होणा-या पतीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेतेय. 50 वर्षाच्या पूजाने सोशल मीडियावर गोवा व्हॅकेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.‘स्वस्थ, आनंदी राहण्यासाठी एन्जॉय गोवा. मेंदूला मुक्त करा. काहीही भीती नाही. आयुष्य हे जगण्यासाठी आहे, स्वत:ला कैद करून घेण्यासाठी नाही. एका व्हायरसच्या दहशतीसह एक वर्ष आणि मग अनेक वर्षे मास्क. हा व्हायरस इतक्यात आपला पिच्छा सोडणारा नाही. वर्षभर मास्क लाऊन आणि लॉकडाऊनमध्ये राहूनही उद्या मृत्यू आला तर...? तर तुम्हाला सर्वात मोठी खंत काय वाटेल? ’, असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी आपल्या हॉट फोटोंमुळे शिवाय तिच्या रिलेशनशिपमुळे  चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर पूजा आदित्य पांचोलीसोबत नात्यात होती. त्यावेळी आदित्यचे लग्न देखील झाले होते. पण तरीही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण आदित्यचे तिच्याच घरात काम करणा-या बाईसोबत संबंध आहेत हे पूजाला कळले आणि त्यामुळे तिने त्याच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 

पूजाने मे 1994 मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना दोन मुलं देखील आहेत.   पूजा आणि द्वीती विक्रमादित्य अनेक महिने नात्यात होते. पूजाने तिचा 40 वा वाढदिवस द्वीतीसोबत गोव्यात साजरा केला होता. त्याच्यासोबत लग्न करण्याची देखील पूजाची इच्छा होती. पण या नात्याला द्वीतीच्या कुटुंबियांनी मान्यता न दिल्याने त्यांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. बिग बॉसच्या घरात असताना पूजा अभिनेता आकाशदीप सेहगलच्या प्रेमात पडली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर देखील त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र पाहाण्यात येत असे. आकाशने पूजाच्या नावाचा टॅटूदेखील हातावर काढला होता. ते दोघे लग्न करतील असे वाटत असतानाच त्यांनी अचानक ब्रेकअप केले.  

पूजाने फेब्रुवारी 2019 मध्ये मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत (Maneck Contractor) साखरपुडा केला. तो तिचा शाळेतील मित्र असून ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. आमिर खानच्या ‘जो जिता वही सिंकदर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पूजा बेदीने  डेब्यू  केला. या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली.

टॅग्स :पूजा बेदी