मुस्लिमांना बाहेरचे लोक म्हणून लेबल लावण्याचे राजकारण केले जातेय : नसीरुद्दीन शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 15:22 IST
बॉलिवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी गेल्या काही काळापासून देशात सुरू असलेल्या ‘देशभक्ती’वरील चर्चेवर आपली ‘मन की बात’ व्यक्त केली. ...
मुस्लिमांना बाहेरचे लोक म्हणून लेबल लावण्याचे राजकारण केले जातेय : नसीरुद्दीन शहा
बॉलिवूड अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी गेल्या काही काळापासून देशात सुरू असलेल्या ‘देशभक्ती’वरील चर्चेवर आपली ‘मन की बात’ व्यक्त केली. यावेळी नसीरुद्दीन शाह यांनी, देशभक्तीच्या प्रमाणांवर सुरू असलेला वाद आणि मुस्लीम समुदायाची स्थिती यावर मत व्यक्त केले. नसीरुद्दीन शाह यांनी म्हटले की, ‘मुस्लिमांना भारतीय असल्याचा गर्व आहे. मात्र बºयाचशा मुस्लिमांचा पाकिस्तानविषयी लगाव असल्याचेही नाकारता येत नाही. परंतु ज्यांना भारताविषयी गर्व आहे, अशांच्या देशभक्तीवर शंका घेतली जात असल्याने वाईट वाटते. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी त्यांचे हे मत हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ‘आपल्या मुलांना त्यांचा धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. आज देशातील बरेचसे असे मुस्लीम आहेत, जे स्वत:ला ‘पीडित’ समजतात. त्यांनी असा विचार करणे बंद करून या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. वास्तविक हे एखाद्या जाळ्याप्रमाणे आहे, ज्यामध्ये सर्व जण सहजासहजी अडकत आहेत. त्यामुळे सर्वांत अगोदर मुस्लिमांनी मनातून ‘पीडित’ असल्याची भावना काढून टाकावी. त्याचबरोबर आपण ही अपेक्षा करणेदेखील बंद करावे की, एखाद्या दिवशी काहीतरी करिष्मा होईल. त्याचबरोबर कोणी आपल्याबद्दल असेही म्हणू नये की, या देशावर तुमचा कमी हक्क आहे. आपण भारतीय आहोत हेच सत्य आहे.पुढे नसीरुद्दीन यांनी लिहिले की, ‘देशात हे पहिल्यांदाच घडत आहे. जो शांततेविषयी बोलतो आणि शांततेची अपील करतो त्यालाच देशद्रोहाचे नाव दिले जात आहे. देशात सध्या मुस्लीम समुदायाला बाहेरचे लोक म्हणून लेबल लावण्याचे राजकारण केले जात आहे. यामुळे अंतर्गत वातावरण खूपच बिघडत असल्याची चिंताही नसीरुद्दीन यांनी व्यक्त केली. नसीरुद्दीन शाह यांनी हा लेख हिंदुस्तान टाइम्सच्या ‘बीर्इंग मुस्लीम नाउ’ या सिरीज अंतर्गत लिहिला आहे. यावेळी नसीरुद्दीन यांनी भारतीय मुस्लिमांच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त करताना लिहिले की, शेकडो वर्षांपूर्वी मुस्लीम हल्लेखोरांनी देशांचे प्रचंड नुकसान केले. याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवा ब्रिगेडला फारशे डोकं लावण्याची गरज पडली नाही. कारण त्यांनी अतिशय पद्धशीरपणे त्याकाळातील किस्से लोकांपर्यंत पोहोचविले आहेत. त्यामुळेच भारतीय मुस्लिमांनी शेकडो वर्षांपूर्वीची शिक्षा देण्यासाठी त्यांना दुय्यम नागरिक म्हणून एकप्रकारे घोषित करण्याचा डाव आखला जात आहे. भलेही आम्ही या देशासाठी स्वत:चे रक्त सांडले असले, परंतु आम्ही त्या विध्वंसकांचे वंशज आहोत, असाच आजही प्रचार केला जात आहे. कित्येक पिढ्या गेल्या तरीही आम्हाला त्यासाठी आज दोषी मानले जात असल्याचेही नसीरुद्दीन यांनी लिहिले.