Join us  

PM Narendra Modi या चित्रपटाला बसला आणखी एक धक्का, युट्युबवरून काढण्यात आला ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:44 PM

पीएम नरेंद्र मोदी बायोपिकचा ट्रेलर लाखोहून अधिक लोकांनी पाहिला होता. हा ट्रेलर दमदार असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. पण आता हा ट्रेलर इंटरनेटवरून गायब झाला आहे.

ठळक मुद्देगुगलवर तुम्ही पीएम नरेंद्र मोदी बायोपिक ट्रेलर असे सर्च केल्यानंतर तुम्हाला मोदीः द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन या वेबसिरिजचा ट्रेलर दिसत आहे. तसेच मोदी बायोपिक ट्रेलर असे टाइप केल्यानंतर हा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत पीएम नरेंद्र मोदी बायोपिकची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट चांगलाच वादात अडकला आहे. हा चित्रपट निर्मात्यांना लोकसभा निवडणूकीच्या आधी प्रदर्शित करायचा होता. त्यामुळे हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनावर निवडणूक आयोगाने स्थगिती आणली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत सांगणे खूपच कठीण आहे. हा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचा या चित्रपटाच्या टीमला चांगलाच धक्का बसला होता. आता तर या चित्रपटाचा ट्रेलरच युट्युबवरून काढण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मार्चमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा ट्रेलर लाखोहून अधिक लोकांनी पाहिला होता. हा ट्रेलर दमदार असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. पण आता हा ट्रेलर इंटरनेटवरून गायब झाला आहे.

गुगलवर तुम्ही पीएम नरेंद्र मोदी बायोपिक ट्रेलर असे सर्च केल्यानंतर तुम्हाला मोदीः द जर्नी ऑफ अ कॉमन मॅन या वेबसिरिजचा ट्रेलर दिसत आहे. तसेच मोदी बायोपिक ट्रेलर असे टाइप केल्यानंतर हा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रेलरला निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे का हे जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक आहेत. पण त्याबाबत अद्याप तरी काहीही माहिती कळू शकलेली नाहीये. 

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत अभिनेता विवेक ऑबेरॉय दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. त्यांनी पीएम नरेंद्र मोदी बायोपिक केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित करण्याची योजना आखली होती. मात्र ती योजना निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे निर्मात्यांसमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चित्रपटात विवेकसोबतच झहीरा वहाब, बोमन इराणी आणि मनोज जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीनरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉय