Join us  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीश कर्नाड यांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 11:19 AM

बंगळुरू- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं आहे. त्याच्या निधनांने चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देकर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेट्विटरवरुन अनेक कलाकारांसाह पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

बंगळुरू- प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचं आज निधन झालं आहे. त्याच्या निधनांने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ट्विटरवरुन अनेक कलाकारांसाह पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाड यांना श्रद्धांजली वाहताना म्हणालेत, येणाऱ्या अनेक पिढ्या गिरीश कर्नाड यांचे काम कायम स्मरणात ठेवतील. 

 

राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनीदेखील गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ''तुमच्या जाण्यानं सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.''  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्विटरवर लिहीले आहे की, ''व्रतस्थ रंगकर्मीला श्रध्दा पूर्वक वंदन.'' 

 

अभिनेता कमल हसन म्हणातात, ''तुम्ही जाताना अनेक लेखकांना तुमच्या लिखाणातून प्रेरणा देऊन गेलेत. '' 

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिते, तुम्ही शिकवलेली मुल्य आणि दिलेले संस्कार कायम माझ्यासोबत राहातील.  

 

 गिरीश कर्नाड यांची मातृभाषा कोकणी आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं. कर्नाड कुटुंबीय कोकणी असले तरी त्यांचा जन्म 19 मे 1938 रोजी माथेरान येथे झाला. पुढे हे कुटुंब कर्नाटकात स्थलांतरीत झालं आणि त्यांनी कन्नड भाषा आपलीशी केली. गिरीश कर्नाड यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता.  या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगने व ओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत. कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळ, मराठी अशा 70 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या.

 

 

टॅग्स :गिरिश कर्नाडनरेंद्र मोदी