Join us  

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकच्या रिलीजचा मार्ग मोकळा, निवडणुकींच्या निकालानंतर होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 6:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  अनेक अडथळ्यांना तोंड देत नरेंद्र मोदींचा बायोपिक  २४ मे ला रिलीज होणार आहे. 

ठळक मुद्दे२४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.  अनेक अडथळ्यांना तोंड देत नरेंद्र मोदींचा बायोपिक  २४ मे ला रिलीज होणार आहे. 

निवडणूक काळात हा चित्रपट रिलीज होणार होता. मात्र निवडणुकी दरम्यान हा चित्रपट मतदारांना प्रभावीत करू शकतो. या अनुंषगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या रिलीजची काही काळासाठी पुढे ढकलेली होती. मतदानाचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर आज सकाळी हा चित्रपट रिलीज करण्याची तारीख जाहीर करण्यात आली. येत्या २३ मे रोजी निवडणुकींच्या निकालानंतर २४ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निर्माते आनंद पंडीत म्हणतात, ''याहुन आनंदाची गोष्ट आमच्यासाठी कोणती नाही, की लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजपर्यंतचा या चित्रपटाच्या रिलीज तारखेला घेऊन चाललेला प्रवास अतिशय खडतर होता. परंतु आम्हाला आशा आहे की येत्या २४ मे ला हा चित्रपट कोणत्याही अडथळ्यांशिवाय रिलीज होईल. पीएम नरेंद्र मोदी या बायोपिकसाठी लोकांची उत्सुकता ताणली आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल याची खात्री आहे.''

यात नरेंद्र मोदींची भूमिका विवेक ऑबेरॉय साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडीत यांनी केली आहे. आनंद पंडीत केवळ निर्माते म्हणूनच नाही तर वितरक म्हणूनही भूमिका बजावत आहेत. त्यांनी पीएम नरेंद्र मोदी बायोपिक केवळ भारतातच नाही, तर इतर देशांतही प्रदर्शित करण्याची योजना आखली होती. या चित्रपटात विवेकसोबतच झहीरा वहाब, बोमन इराणी आणि मनोज जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

टॅग्स :पी. एम. नरेंद्र मोदीविवेक ऑबेरॉयनरेंद्र मोदी