Join us

​करण सिंह ग्रोवरच्या प्री-बर्थ डे पार्टीचे फोटो पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 13:29 IST

उद्या म्हणजे २३ फेबु्रवारी हा करणसिंह ग्रोवर याचा बर्थ डे. पण या बर्थ डेचे सेलिब्रेशन दोन दिवसांआधीच सुरु झालेय. विश्वास बसत नसेल तर या सेलिबे्रशनचे काही फोटो तुम्ही बघायलाच हवेत.

बॉलिवूडचे सगळ्यात हॅपनिंग आणि क्यूट कपल कोणते? ही यादी फार मोठी आहे. पण या यादीत एका कपलचे नाव घ्यावेच लागेल. हे कपल म्हणजे, हॉट अ‍ॅण्ड सेक्सी बिपाशा बसू आणि तिचा हँडसम हबी करण सिंह ग्रोवर. गेल्या काही दिवसांपासून हे कपल कुठल्याही चित्रपटात झळकलेले नाही. पण पार्टी व इव्हेंट म्हटले की, हे कपल हमखास दिसणार म्हणजे दिसणार. आता बर्थ डे असेल तर मग विचारूच नका. होय, उद्या म्हणजे २३ फेबु्रवारी हा करणसिंह ग्रोवर याचा बर्थ डे. पण या बर्थ डेचे सेलिब्रेशन दोन दिवसांआधीच सुरु झालेय. विश्वास बसत नसेल तर या सेलिबे्रशनचे काही फोटो तुम्ही बघायलाच हवेत.करणच्या प्री-बर्थ डे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करणने या फोटोंचा एक व्हिडिओ बनवून आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. शिवाय आपल्या लाडक्या पत्नीला अर्थात बिपाशाला थँक्यू सुद्धा म्हटले आहेत. या फोटो करण आणि बिपाशा दोघेही धम्माल मस्ती, मज्जा करताना दिसताहेत.करणच्या प्री-बर्थ डे पार्टीचा इंटरेस्टिंग तेवढाच क्रिएटीव्ह केक, मित्रासोबतच्या त्याच्या फनी सेल्फिज आणि बेटरहाफचे अविस्मरणीय क्षण हे सगळे पाहायचे असेल तर या व्हिडिओला क्लिक करा आणि बघा...करणला हॅपी बर्थ डे विश करायलाही विसरू नकाच. करणसिंह ग्रोवर लवकरच टेलिव्हिजनवर दिसणार अशी खबर आहे. याऊलट बिपाशा सलमानसोबत बिझी होणार आहे. सलमान खानच्या दबंग टूरमध्ये 2003मध्ये बिपाशा सहभागी झाली होती आणि आता त्याची ही टूर एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा जगभराचा दौरा करणार आहे आणि यावेळीदेखील या टूरमध्ये बिपाशाचा सहभाग असणार आहे.