Join us

इंदिरा गांधी यांच्यासोबत चित्रपटसृष्टीतील दिग्गज एका फोटो फ्रेममध्ये, दुर्मिळ फोटोतील कलाकार ओळखा पाहू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 10:32 IST

फोटो आठवणींना उजाळा देतात. त्यामुळे कोणताही क्षण कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद करण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. तो फोटो पाहून प्रत्येकजण जुन्या ...

फोटो आठवणींना उजाळा देतात. त्यामुळे कोणताही क्षण कॅमे-याच्या लेन्समध्ये कैद करण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. तो फोटो पाहून प्रत्येकजण जुन्या आठवणीत रमून जातो. जुन्या फोटोंना एक वेगळंच महत्त्व असतं. मग ते आपल्या खासगी आयुष्यातील फोटो असो किंवा एखादा ऐतिहासिक फोटो. प्रत्येक फोटोचं वेगळेपण असतो. एखादा फोटो आपल्याला त्या काळात घेऊन जातो. हिंदी सिनेमा आणि राजकारण याचंही वेगळंच कनेक्शन आहे. अनेक कलाकारांनी अभिनयाने रुपेरी पडद्याससह राजकारणाचं क्षेत्रही गाजवलं आहे. त्यामुळे वेळोवेळी राजकीय नेते बॉलिवूडच्या कार्यक्रम, सोहळे आणि पार्ट्यांमध्ये पाहायला मिळतात. तसंच कलाकारही राजकारणाच्या व्यासपीठावर आणि निवडणुकीच्या प्रचारातही पाहायला मिळतात.असाच राजकारण आणि बॉलिवूडची छाप असलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोला राजकीय महत्तव आहेच शिवाय त्याला मनोरंजनाचीही पार्श्वभूमी आहे. 1950-1960 च्या दशकातील किती कलाकार तुम्हाला आठवतात ? यापैकी डझनभर कलाकारांची नावं तुम्हाला माहित आहेत का? जर तुम्हाला त्या काळात पुन्हा एकदा जायचं असेल तर सोशल मीडियावरील हा फोटो नक्की पाहा. चित्रपटसृष्टीच्या दिग्गजांना एकत्र पाहायला मिळणं कठीण आणि त्या सगळ्या कलाकारांना एका फोटो फ्रेममध्ये पाहायला मिळणं हे त्याहूनही जास्त कठीण. मात्र या फोटोत एक दोन नाही तर तब्बल 20 हून अधिक कलाकार एका फ्रेममध्ये पाहायला मिळतील.फोटोत अवघं बॉलिवूड एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वीच्या या फोटोत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह त्यावेळचे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती पाहायला मिळत आहेत. या फोटोमध्ये इंदिरा गांधी यांच्या शेजारी भारतरत्न लता मंगेशकर, दिग्दर्शक-अभिनेता राज कपूर, ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार, भारत कुमार फेम अर्थात मनोज कुमार पाहायला मिळत आहेत. याशिवाय मागच्या रांगेत धर्मेंद्र, विनोद खन्ना, फिरोज खान, अभिनेत्री शर्मिला टागोर, सायरा बानो पाहायला मिळत आहेत. हा फोटो नेमका कधी काढण्यात आला आहे. तो कोणत्या वर्षात काढण्यात आला याबाबत साशंकता आहे. या फोटोत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आहेत.त्यामुळे इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान म्हणून कारकिर्दीमधील पहिल्या टर्ममध्ये म्हणजेच 1966-1971 या काळात हा फोटो काढण्यात आल्याचं बोललं जात आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. एक उत्कृष्ट फोटो. ज्यात इंदिरा गांधी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील बडे कलाकार पाहायला मिळत आहेत.राज बब्बर यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्याला अल्पावधीत प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स मिळू लागल्या. या फोटोतील अनेक चेह-यांना कदाचित तुम्हीसुद्धा ओळखत असाल. चला तर तुम्हीही सांगा या फोटोत ओळखलेल्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची नावं. खाली कमेंट देऊ कळवा आम्हाला.