सरकारने पेट्रोल-डिझलची किंमत एक पैशांनी केली कमी; प्रकाश राजने म्हटले, ‘ही तर नौटंकी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 21:22 IST
अभिनेता प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारने पेट्रोल-डिझेलची किंमत एक पैशांनी कमी केल्यानंतर प्रकाश राजने त्यास नौटंकी असे म्हटले आहे.
सरकारने पेट्रोल-डिझलची किंमत एक पैशांनी केली कमी; प्रकाश राजने म्हटले, ‘ही तर नौटंकी’!
सातत्याने १६ दिवस पेट्रोल डिझलच्या किंमती वाढविल्यानंतर केंद्र सरकारने आता काहीसा दिलासा दिला आहे. मात्र हा दिलासा म्हणावा तसा नक्कीच नाही. कारण पेट्रोल डिझलच्या किंमतीमध्ये केवळ एका पैशाने घटविल्या आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी संधी साधत चौफेर टीका करण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना एक पैशांनी किंमती कमी केल्यावरून त्यांची चांगलीच फिरकी घेतली. तर बॉलिवूड आणि साउथ अभिनेते प्रकाश राज यांनीही नेहमीप्रमाणे टीकेची झोड उठवित यास ‘नौटंकी’ असे म्हटले आहे. }}}} पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशावरून कमी केल्याबद्दल सरकारवर टीका करताना प्रकाश राज यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी... देशातील नागरिकांना सरकारची ही ‘नौटंकी’ बघून आनंदी व्हायला हवे काय? मला विचारावेसे वाटते की, यामुळे खरोखरच आमचा पैसा वसुल होणार आहे काय?}}}} या अगोदर कॉँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर करताना ट्विट केले की, ‘डियर पीएम, तुम्ही पेट्रोल-डिझलच्या किंमती एक पैशांनी कमी केल्या आहेत. जर ही मस्करी असेल तर हा बालिशपणा आहे. जर एक पैशांची कपात हे जर माझ्या चॅलेंजचे उत्तर असेल तर ते जनतेला मान्य नाही.