Join us  

सुशांतला हॉट न म्हणणाऱ्या सोनमला पायल रोहतगीने सुनावले खडेबोल, म्हणाली - तुझा नवरा टकला आणि... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:18 PM

सुशांत सिंग राजपूतला हॉट न म्हणणाऱ्या सोनम कपूरवर पायल रोहतगीने निशाणा साधला आहे. तिने सोनम कपूरला तुझ्या नवऱ्यापेक्षा सुशांत खूप हॉट आणि टॅलेंटेड आहे, असे म्हटलंय.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. त्यात सुशांतचे बरेच जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात सोनम कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात ती सुशांत सिंग राजपूत हॉट नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पायल रोहतगीने सोनम कपूरवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, सोनम तूझा नवरा हॉट नाही. राम राम जी.. सोनम कपूर तुझा नवरा टकला आहे आणि त्याला अजिबात शरीरयष्टी नाही.

या व्हिडिओत पायल म्हणतेय की, नेहा धुपिया फेमिनिस्ट, स्वरा भास्कर ही चळवळीतील आहे आणि अनन्या पांडेने खूप स्ट्रगल केला आहे. हे सगळे खोटे आहे. सोनम कपूर स्वतः अभिनेत्री नाही. हे आहे बॉलिवूडमधील सत्य. सोनम कपूरने ट्विटरवर मला ब्लॉक केले आहे. कारण तिला माझे व्हिडिओ कदाचित आवडत नाही. एकेकाळी सोनम कपूरला सुशांत सिंग राजपूत हॉट वाटत नव्हता. कारण करण जोहरच्या शोमध्ये बसली आहे म्हणून तुला वाटलं की तू काहीही बरळू शकते. आज मी संपूर्ण जगाला सांगतेय की सोनम तुझा नवरा अजिबात हॉट नाही. त्याचे नाव आहे आनंद आहुजा. त्याने त्याच्या केसांचं काहीतरी केले आहे. त्याला अजिबात शरीरयष्टी नाही. तरीदेखील तूला तो हॉट वाटतो. याचा अर्थ की तुझी हॉटनेसची व्याख्या चुकीची आहे. तुझ्या नवऱ्याच्या तुलनेत सुशांत खूप हॉट आणि टॅलेंटेड आहे. कुठेतरी तुझ्या पाहण्यात चुक आहे. म्हणून तुला भारत व देश नकली म्हणते. 

पायल पुढे म्हणाली की, तुझे कर्मा हे आहे की अनिल कपूरची मुलगी असूनही वडिलांचा पैसा स्वतःच्या सिनेमात टाकून तू यापेक्षा जास्त यशस्वी होऊ शकत नाही. हे सर्व देशाला माहित आहे. प्रत्येक जण तुझ्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार आहे.

 

टॅग्स :सोनम कपूरपायल रोहतगी