Join us  

अनुराग कश्यपविरोधात त्वरित कारवाई करा अन्यथा...! अभिनेत्री पायल घोषचा इशारा

By रूपाली मुधोळकर | Published: September 27, 2020 8:15 PM

अनुरागविरोधात तात्काळ कारवाई करत, त्याला अटक करावी, अशी मागणी करत पायल घोष आज रविवारी वर्सोवा ठाण्यात पोहोचली. 

ठळक मुद्दे अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष हिने आता आक्रमक पवित्रा घेत, अनुरागला अटक करण्याची मागणी केली आहे. अनुरागविरोधात कारवाई झाली नाही तर आपण आमरण उपोषणावर बसू, असा इशारा तिने दिला आहे.आज वर्सोवा पोलिस ठाण्याबाहेर मीडियाशी बोलताना पायलने हा इशारा दिला. अनुराग कश्यप एक ‘प्रभावशाली व्यक्ति’ आहे त्यामुळे  एफआयआर दाखल करूनही अद्याप पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. मला न्याय मिळाला नाही तर मी आमरण उपोषणावर बसेन, असे पायल घोष म्हणाली.

अनुरागविरोधात तात्काळ कारवाई करत, त्याला अटक करावी, अशी मागणी करत पायल घोष तिच्या वकीलासोबत आज रविवारी वर्सोवा ठाण्यात पोहोचली. मात्र तिला  अधिका-यांना भेटता आले नाही. ती म्हणाली, आज तपास अधिकारी ठाण्यात नव्हते. त्यामुळे माझी भेट झाली नाही. मला सोमवारी येण्यास सांगण्यात आले. याच ठाण्यात गेल्या 22 सप्टेंबरला पायलने अनुरागविरोधात एफआयआर दाखल केला होता. 2013 मध्ये अनुरागने आपल्यासोबत लैंगिक गैरवर्तन केले होते, असा आरोप पायलने केला आहे. अर्थात अनुरागने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले होते. अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. नरेंद्र मोदीजी, कृपया कारवाई करा़ या सर्जनशील व्यक्तिमागील राक्षस देशाला पाहू दे़ यामुळे माझे नुकसान होऊ शकते, याची मला कल्पना आहे. माझ्या सुरक्षेला धोका आहे. कृपया मदत करा,’असे ट्विट पायलने केले होते.

काय म्हणाली होती पायल घोषअभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे.झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने तिच्यासोबत काय काय केले, ते सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले की, ‘अनुरागने मला घरी बोलावले होते. तो स्मोकिंग करत होता. काही वेळानंतर त्याने मला दुस-या खोलीत नेले.  त्यानंतर त्याने मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक तो माझ्यासमोर न्यूड झाला आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्याला  मला कन्फर्टेबल वाटत नाही, असे म्हणाले. यावर मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाला.  मी  तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो.

'छताला लटकलेली दिसेन, पण ती माझी आत्महत्या नसेल'; पायल घोषचं खळबळजनक विधान

‘इतका ड्रामा करण्याची गरज नाही...’; व्हायरल होतेय पायल घोषचे ते जुने ट्विट

SEE PICS : अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी पायल घोष आहे तरी कोण? अनुरागने नाकारले आरोप अनुरागने एकापाठोपाठ एक ट्विट करत पायल घोषच्या आरोपांना उत्तर दिले होते. थोडी तर मर्यादा बाळगा, जे काही आरोप आहेत ते बिनबुडाचे, निराधार आहेत, असे अनुरागने म्हटले होते.हा सगळा मला फसवण्याचा कट असल्याचा दावा अनुरागने केला होता.क्या बात है, मला चूप करण्यासाठी इतका वेळ घेतला. काही हरकत नाही. पण मला चूप करण्यासाठी इतके खोटे बोललात की, दुस-या महिलांनाही यात ओढले. थोडी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढेच म्हणेल की, जे काही आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, असे   ट्विट अनुरागने त्याने केले होते.    

टॅग्स :अनुराग कश्यप