Join us  

अनुराग कश्यप म्हणाला मी 'तेव्हा' भारतात नव्हतोच, तर त्यावर पायल घोष म्हणाली -

By अमित इंगोले | Published: October 02, 2020 2:23 PM

अनुरागची वकील प्रियंका खिमानी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत पायल म्हणाली की, अनुराग खोटं बोलत आहे.

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावत मुंबई पोलिसात एफआयआर दाखल केला होता. पायलच्या तक्रारीवरून १ ऑक्टोबरला पोलिसांनी अनुराग कश्यपला चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीत अनुरागने पायल घोषचे सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. सोबतच अनुरागची वकील प्रियंका खिमानी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत पायल म्हणाली की, अनुराग खोटं बोलत आहे.

पायलने ट्विट करत लिहिले की, 'मिस्टर अनुराग कश्यपने पोलिसांना दिलेली माहिती खोटी आहे. सत्य समोर आणण्यासाठी माझे वकील अनुराग कश्यपची नार्को एनालिसिस, लाय डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट करण्याचा अर्ज देतील. न्याय मिळवण्यासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये हा अर्ज दिला जाईल'. पायलने तिच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही टॅग केलं आहे.

काय म्हणाला अनुराग?

अनुराग कश्यपच्या वकील प्रियंका यांनी जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे की, अनुराग कश्यपने पोलिसांना सांगितले की, ज्या वेळी ऑगस्ट २०१३ मध्ये कथित लैंगिक शोषणाचा आरोप पायल घोष लावत आहे त्यावेळी अनुराग श्रीलंकेत त्याच्या एका सिनेमाचं शूटींग करत होता. त्यांनी हेही सांगितलं की, त्यांनी पुरावे म्हणून काही कागदपत्रेही सादर केली आहेत. 

प्रियंका यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की, 'मिस्टर कश्यप यांनी भीती आहे की, पायल घोषचे आरोप खोटे असल्याचे पुरावे दिले गेले आहेत तर ती पुन्हा घटनेबाबत आपला जबाब बदलेल. अनुराग कश्यप हे त्यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांमुळे दु:खी आहे. याने त्यांना, त्यांच्या परिवाराला आणि फॅन्सना त्रास झालाय. अनुराग कश्यप हे सर्वच कायदेशीर उपायांचा पालन करतील. कश्यप यांनी असं काही झालं नसल्याचं स्पष्ट केलंय आणि मिस घोष विरोधात कठोर कारवाईची आशा आहे. पायल घोषने न्याय व्यवस्थेचा चुकीचा वापर केलाय. चुकीच्या उद्देशासाठी  मी टू मुव्हमेंटचा वापर केला. मिस्टर कश्यप यांना विश्वास आहे न्याय नक्की मिळणार'. 

टॅग्स :पायल घोषअनुराग कश्यपबॉलिवूडलैंगिक छळ