Join us

माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर थिरकली अंकिता लोखंडे, व्हायरल झाला ‘कातिलाना’ व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 11:55 IST

15 तासांत 2 लाखांवर लाईक्स

ठळक मुद्देअंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचा नवा व्हिडीओ. होय, तिच्या या नव्या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत अंकिता माधुरी दीक्षितच्या ‘धकधक करने लगा’ या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसते आहे.माधुरीच्या या गाण्यावर अंकिताच्या ‘कातिलाना’ डान्सवर चाहते फिदा झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत अंकिताने पिवळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे. केवळ 15 तासांत या व्हिडीओला 2 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत.

अंकिताने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर   सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसापासून ती तिच्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते आहे. ती सातत्याने व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो. नुकताच अंकिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ती शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या ‘तितली’ या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. तिचा या गाण्यावरील डान्स पाहून चाहते थक्क झाले होते.  इतकेच नाही तर तिचा हा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.

अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.

टॅग्स :अंकिता लोखंडे