Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्रलेखाची साऊथमध्ये एन्ट्री, लवकरच होणार चित्रीकरणाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 19:45 IST

पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर आता ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देपत्रलेखा झळकणार 'व्हेअर इज माय कन्नडका' या कानडी चित्रपटात

अभिनेत्री पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित 'सिटीलाईट्स'मधून २०१४ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर आता ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा कानडी सिनेमा असून त्यात काम करण्यासाठी ती खूप उत्सुक आहे. 

पत्रलेखा पॉल 'व्हेअर इज माय कन्नडका' या कानडी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट असून यात ती लोकप्रिय अभिनेता गणेशसोबत दिसणार आहे. एप्रिल महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असून बहुतांश सीन्स हे लंडनमध्ये शूट होणार आहेत. 'व्हेअर इज माय कन्नडका' चित्रपटाची कथा, पटकथा, स्टारकास्ट आणि प्री-प्रोडक्शन असे सगळे काही जुळून आले असून यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात युनायटेड किंगडममध्ये संपूर्णतः शूट होणार आहे. या वर्षाअखेरीस सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतील. कन्नड आणि हिंदीमधील अनेक टेलिव्हिजन शोजचे दिग्दर्शन केलेल्या राज आणि दामिनी ही नवरा बायकोची जोडी पत्रलेखाच्या या आगामी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

पहिल्यांदा कानडी सिनेमात काम करण्यास उत्सुक असल्याचे पत्रलेखाने सांगितले व पुढे म्हणाली की, हा माझा पहिला कानडी सिनेमा असून मी खूप उत्सुक आहे. सिनेमातील भूमिकेबद्दल मी आता फारसे काही बोलू शकत नसले तरी मी आजवर ऑनस्क्रीन असे काही काम केले नाही एवढे मात्र नक्की. त्यामुळे अर्थातच ही भूमिका माझ्यासाठी खास आहे. पत्रलेखाचे चाहते या चित्रपटाबद्दल व तिच्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :पत्रलेखा