Join us

परिणीती चोप्रा का बोलली खोटे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 15:21 IST

बॉलिवूड कलाकारांना संघर्ष चुकलेला नाही. विशेषत: तुम्ही सुपरस्टार्सची मुलं नसाल तर संघर्ष अटळ आहे. प्रत्येक स्टारची आपली एक कहाणी ...

बॉलिवूड कलाकारांना संघर्ष चुकलेला नाही. विशेषत: तुम्ही सुपरस्टार्सची मुलं नसाल तर संघर्ष अटळ आहे. प्रत्येक स्टारची आपली एक कहाणी आहे. अलीकडे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने आपल्या स्ट्रगलिंग लाईफबद्दल अशाच काही गोष्टी शेअर केल्या होत्या. लहानपणी माझ्या कुटुंबाची कमाई अतिशय तुटपुंजी होती, असे काय काय तिने सांगितले होते. माझ्या लहानपणी आमच्याकडे फार पैसा नव्हता. आमच्याकडे कारही नव्हती. मी सायकलने शाळेत जायची, असे तिने सांगितले. तिच्या या गोष्टी ऐकल्यानंतर अनेकांनी परिणीतीची प्रशंसा केली. तिच्या धैर्याची आणि आज ती ज्याठिकाणी आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाºया चिकाटीची तारिफ केली. पण यात काही जण असेही होते, ज्यांना परिणीतीच्या या गोष्टी जराही पचनी पडल्या नाहीत. होय, लहानपणी परिणीतीचे वर्गमित्र राहिलेल्या काहींना यासाठी परीला चक्क खोटारडी ठरवले. परिणीतीच्या एका वर्गमैत्रिणीने यासाठी तिला चांगलेच फैलावर घेतले.‘ परिणीतीच्या कुटुंबाकडे कार नव्हती आणि ती सायकलने शाळेत यायची म्हणजे काय? परिणीती इतकी खोटी कशी बोलू शकते. त्यावेळी सायकलने फिरणे हा ट्रेंड होता’, असे या वर्गमैत्रिणीने म्हटले.आता कोण खरे बोलतयं अन् कोण खोटे, हे तर परिणीती अािण तिच्या वर्गमैत्रिणीलाच ठाऊक़ पण खरे काय, हे जाणून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडेल. होय ना?परिणीती चोप्राचा जन्म अंबाला येथे झाला होता. कॉन्व्हेंट आॅफ जीजस अ‍ॅण्ड मेरीमध्ये तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने मॅनचेस्टर युनिव्हर्सिटीतून बिझनेसमध्ये आॅनर्सची ट्रिपल डिग्री घेतली. सध्या परिणीती ‘गोलमान4’ मध्ये बिझी आहे.