Join us  

राघव चड्डा-परिणीतीच्या रिसेप्शनची चर्चा, एक दोन नाही तर तीन ठिकाणी होणार ग्रँड पार्टी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:00 AM

राघव आणि परिणीतीचे रिसेप्शन कुठे होणार?

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा (Raghav Chadda) काल लग्नबंधनात अडकले. राजस्थानच्या द लीला पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या जोडप्याचे फोटो कधी समोर येतात याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लग्नानंतरचा पहिला फोटो नुकताच समोर आला असून परी खूपच सुंदर दिसत आहे. गुलाबी साडी,  सिंदूर आणि अगदी साध्या मेकअपमध्ये तिने मन जिंकलं. तर राघव चड्डा सूट-बूट मध्ये हिरोपेक्षा कमी दिसत नव्हते. आता या नवीन कपलच्या रिसेप्शनची चर्चा सुरु झाली आहे.

माध्यम रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव चड्डा यांच्या लग्नानंतर काल रात्रीच पहिलं रिसेप्शन पार पडलं. द लीला पॅलेसमध्येच हे रिसेप्शन झालं. लग्नात आलेले पाहुणे रिसेप्शनमध्ये सामील झाले. मात्र याशिवायही आणखी  रिसेप्शन पार्टी होणार आहे.  ती पण एक नाही तर आणखी दोन रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. एक रिसेप्शन दिल्ली तर दुसरं मुंबईत होणार असल्याची चर्चा आहे. 

दिल्लीत होणाऱ्या रिसेप्शन पार्टीला राजकीय घराण्यातील दिग्गज उपस्थित असतील. तर परिणीती तिच्या बॉलिवूडमधील मित्रपरिवारासाठी मुंबईत रिसेप्शन देणार आहे. याठिकाणी फिल्मी कलाकार येतील. इतकंच नाही तर चंदिगढमध्येही रिसेप्शन देण्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

राघव आणि परिणीती यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. दोघंही कॉलेजमध्ये एकत्र होते मात्र तेव्हा ते केवळ मित्र होते. काही वर्षांपूर्वी एका फिल्म सेटवर परिणीती आणि राघव यांची पुन्हा भेट झाली. कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या. दोघांमध्ये प्रेमही फुललं आणि आता ते सात जन्मासाठी बांधले गेले आहेत.

टॅग्स :परिणीती चोप्रालग्नआम आदमी पार्टी