Join us  

लगीन घटिका समीप आली! परिणीती-राघव चड्डा आज बांधणार लग्नगाठ, दोन मुख्यमंत्र्यांची झाली एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 11:19 AM

हळद, मेहंदी, संगीत थाटात पार पडल्यानंतर आता लगीन घटिका समीप आली आहे. 

बॉलिवूडमध्ये एका लग्नसोहळ्याची सर्वांनाच आतुरता होती तो लग्नसमारंभ आज पार पडणार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्डा (Raghav Chadda) आज सात फेरे घेणार आहेत. हा शाही विवाहसोहळा उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये पार पडतोय. २२ सप्टेंबरपासूनच वेगवेगळ्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली. हळद, मेहंदी, संगीत थाटात पार पडल्यानंतर आता लगीन घटिका समीप आली आहे. 

आज परिणीती आणि राघव साताजन्माची गाठ बांधणार आहेत.  याची सुरुवात राघवच्या सेहराबंदीने होणार आहे. दुपारी १ वाजता ताजच्या लेक पॅलेसमध्ये  हा विधी पार पडेल.  तर २ वाजता राघवची वरात बोटीने लीला पॅलेसकडे रवाना होणार आहे. दुपारी ३.३० वाजता जयमाला सेरेमनी होणार आहे. यानंतर इतर विधी टप्प्याटप्प्याने पार पडतील. शेवटी संध्याकाळी ६.३० वाजता परिणीतीची विदाई होईल. तर आजच रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान लीला पॅलेसमध्ये नवीन जोडप्याचं रिसेप्शन पार पडेल.

परिणीती-राघव चड्डा यांच्या लग्नात कोण कोण येणार?

या शाही विवाहसोहळ्यासाठी दोन मुख्यमंत्री नुकतेच पोहोचले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उदयपूरला आले आहेत. परिणीती -राघव यांचे जवळचे नातेवाईक असणार आहेत. तर बॉलिवूडमधून मनिष मल्होत्राची एंट्री झाली असून करण जोहर, अक्षय कुमार, फराह खान हे देखील येण्याची शक्यता आहे. तर परिणीतीची बहीण ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा लग्नाला येणार नाही अशी चर्चा आहे.

टॅग्स :परिणीती चोप्राआम आदमी पार्टीउदयपुरलग्न