Join us  

सायना नेहवाल बायोपिकसाठी रिहर्सल करताना परिणीतीला झाली दुखापत, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 6:53 PM

परिणीतीचा बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेत असल्याचे फोटो समोर आले आहेत.

परिणीती चोप्राने काही दिवसांपूर्वीच द गर्ल ऑन ट्रेन सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीला लागली आहे. सायनाची भूमिका साकारण्यासाठी परिणीती बॅटमिंटन कोर्टवर अनेक तास घाम गाळते आहे. परिणीतीचा बॅटमिंटनचे प्रशिक्षण घेत असल्याचे फोटो बऱ्याचदा समोर आले आहेत. मात्र नुकताच तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो पाहून तिच्या मानेला दुखापत झाल्याचं समजतं आहे.

परिणीतीने इंस्टाग्रामवर दुखापतीचा फोटो शेअर करत म्हटलं की, डुड. मी आणि सायना चित्रपटाची संपूर्ण टीम कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून खूप काळजी घेत होतो. पण ते झालंच. पुन्हा बॅडमिंटन खेळण्यासाठी आता मला जास्त आराम करावा लागेल.

अमोल गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सिनेमाची शूटिंग 11 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. 

एका मुलाखतीत दरम्यान परिणीतीने सांगितले की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात. अनेक वर्षे मेहनत घेतल्यानंतर ते त्या खेळात प्राविण्य मिळवतात किंवा यश संपादन करतात. या सगळ्या गोष्टी रुपेरी पडद्यावर दाखवता याव्या यासाठी मी माझ्या परिने पूर्णपणे प्रयत्न करेन.

बॅडमिंटन हा एक कठीण खेळ आहे. त्यासाठी कठोर परिश्रमही तितकेच गरजेचे आहेत.त्यामुळे सध्या बॅटमिंटनसह इतर गोष्टींवर परिणीती मेहनत घेत आहे. तसेच या वर्षी सिनेमाची शूटिंगही संपवून 2020 मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्माते भूषण कुमार यांनी ठरवले आहे.

परिणीतीचा सायनाच्या लूकमधला फोटोदेखील समोर आला आहे. परिणीती व सायनाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. 

टॅग्स :परिणीती चोप्रासायना नेहवाल