Join us  

'उरी' मध्ये या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार परेश रावल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 11:41 AM

'उरी..द सर्जिकल स्ट्राईक'चा ट्रेलर आऊट झाल्यापासून सिनेमा उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते.

ठळक मुद्दे'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहेया सिनेमाचे अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत देखील झाली होती

'उरी..द सर्जिकल स्ट्राईक'चा ट्रेलर आऊट झाल्यापासून सिनेमा उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. जम्मू काश्मीरच्या 'उरी' येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा 'उरी' सिनेमा आहे. 

या सिनेमात परेश रावल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका साकारणार आहेत. परेश रावल यांनी ही भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचा अंदाज ट्रेलर बघून येतो.    

 यात विकी कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुखे भूमिका आहे. तर मोहित रैना, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत देखील झाली होती.

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण उरी अॅटॅकनंतर प्रत्येक जणांना वाटत होते की पाकिस्तानलाही तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी संपूर्ण भारताने जवानांचे कौतूक केले होते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने 'मसान', 'राझी', 'संजू' आणि अलिकेडेच रिलीज झालेल्या 'मनमर्जियां', या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. 

टॅग्स :उरीविकी कौशलपरेश रावलयामी गौतम