Join us

पापा शाहरुख खानच्या वाढदिवशी वैतागला अबराम, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 21:54 IST

बॉलिवूडमध्ये आज दिवसभर किंग खान शाहरुखच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन बघावयास मिळाले. शाहरुखने अलिबागमधील त्याच्या फार्म हाउसवर जंगी बर्थ डे पार्टीचे ...

बॉलिवूडमध्ये आज दिवसभर किंग खान शाहरुखच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन बघावयास मिळाले. शाहरुखने अलिबागमधील त्याच्या फार्म हाउसवर जंगी बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अलिबागमध्ये बर्थ डे सेलिब्रेशन झाल्यानंतर शाहरुखच्या मुंबईस्थित घरीही जोरदार पार्टी रंगली होती. प्रत्येक ठिकाणी शाहरुखसोबत त्याचा परिवार बघावयास मिळाला. त्याची पत्नी गौरी खान, मोठा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना पार्टीमध्ये शाहरुखसोबत एन्जॉय करताना दिसले. परंतु त्याचा लहान मुलगा अबराम मात्र सेलिब्रेशनमुळे चांगलाच वैतागला होता. अर्थात ज्या पद्धतीचे अबरामचे फोटो समोर आले त्यावरून त्याने पार्टीत फारसा एन्जॉय केला असेल असे अजिबात दिसत नाही. सकाळी जेव्हा शाहरुख परिवारासमवेत अलिबागला निघाला होता तेव्हा अबरामचे काही फोटो समोर आले होते. त्यानंतर अलिबागहून मुंबईला हेलिकॉप्टरने परतानाचे काही फोटो समोर आले. मात्र फोटोमध्ये अबराम अलिबागहून मुंबईत परतण्यास फारसा उत्सुक दिसला नाही. त्यामुळे शाहरुखने त्याला बळजबरीने उचलून हेलिकॉप्टरने बसविले. त्यानंतर शाहरुख आणि अबराम हे दोघे मुंबईतील त्याच्या मन्नत बंगल्यात चाहत्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसले. शाहरुख अबरामला घेऊन छतावर आला होता. शाहरूख चाहत्यांचे अभिवादन स्वीकारण्यात दंग असताना अबरामचा चेहरा बघण्यासारखा होता. त्याच्या चेहºयावरील थकवा स्पष्टपणे दिसत होता. शाहरुखने सोशल मीडियावर  अबरामसोबतचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो खूपच वैतागलेला दिसत आहे. आता तो दिवसभराच्या थकव्यामुळे वैतागला की शाहरुखच्या कुठल्या तरी गोष्टीवरून तो त्याच्यावर नाराज झाला हे सांगणे मात्र मुश्कील आहे. असो, किंग खानवर आज दिवसभर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.