‘पापा कहते है’ची ‘ही’ हिरोईन आता करतेय कंपनीत नोकरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 12:24 IST
सन १९९६ मध्ये आलेला ‘पापा कहते है’ हा चित्रपट आणि यातील ‘घर से निकलते ही...’ हे गाणे तुम्हाला आठवत ...
‘पापा कहते है’ची ‘ही’ हिरोईन आता करतेय कंपनीत नोकरी!
सन १९९६ मध्ये आलेला ‘पापा कहते है’ हा चित्रपट आणि यातील ‘घर से निकलते ही...’ हे गाणे तुम्हाला आठवत असेल तर यातील निळ्या सुंदर डोळ्यांची अभिनेत्रीही नक्कीच आठवत असणार. होय, मयुरी कान्गो, हीच ती अभिनेत्री. मयुरी अखेरची २००९ मध्ये आलेल्या ‘कुर्बान’ या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती ना कुठल्या बॉलिवूड पार्टीत दिसली, ना कुठल्या इव्हेंटमध्ये. याचे कारण म्हणजे, बॉलिवूडला राम राम ठोकून मयुरी तिच्या वैवाहिक आयुष्यात रमली आहे. एकेकाळी कॅमे-यापुढे अभिनय करणारी ही गोड चेहºयाची अभिनेत्री सध्या गुडगावच्या एका कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहे. दहावीत असतानाच दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी मयुरीला चित्रपटाची आॅफर दिली होती. मयुरीने ही आॅफर स्वीकारली आणि १९९५ मध्ये मिर्झा यांच्या ‘नसीम’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर मयुरीने अनेक चित्रपटांत काम केले. पण ‘पापा कहते है’ आणि ‘होगी प्यार की जीत’ या चित्रपटाशिवाय तिचे कुठलेही चित्रपट चालले नाहीत. यानंतर २००० मध्ये ती छोट्या पडद्यावर आली. ‘नरगिस’,‘थोडा गम थोडी खुशी’,‘डॉलर बाबू’,‘किट्टी पार्टी’ अशा काही सिरिअल्समध्ये ती दिसली. मात्र इथेही तिला फार यश मिळाले नाहीच. कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल पण मयुरी आयआयटी कानपूरमध्ये सिलेक्ट झाली होती. पण चित्रपटातील करिअरसाठी तिने येथे प्रवेश न घेण्याचा निर्णय घेतला होता. अभिनय क्षेत्रात नशीबाने साथ दिली नाही म्हटल्यावर २००३ मध्ये मयुरीने एनआरआय आदित्य ढिल्लनसोबत लग्न केले. दोघांचीही पहिली भेट एका पार्टीत झाली होती. लग्नानंतर मयुरी आदित्यासोबत अमेरिकेत स्थायिक झाली. येथे तिने मार्केटींग आणि फायनान्समध्ये एमबीए केले. २००४ ते २०१२पर्यंत तिने अमेरिकेत नोकरी केली. २०१३ मध्ये ती भारतात पतरली. आता ती गुडगाव येथे नोकरी करते. २०११ मध्ये मयुरीने एका मुलाला जन्म दिला.