Join us  

देशभक्तीची भावना जागृत करणारे 'पलटन'मधील शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 6:00 PM

जे.पी. दत्ता यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'पलटन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील देशाभिमानाची भावना जागृत करणारे टायटल साँग स्वातंत्र्या दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजे.पी. दत्ता, जावेद अख्तर आणि अनू मलिक हे त्रिकूट आले पुन्हा एकत्र 'पलटन' चित्रपट ७ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

जे.पी. दत्ता यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'पलटन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील देशाभिमानाची भावना जागृत करणारे टायटल साँग स्वातंत्र्या दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आले आहे. 'वंदे मातरम' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अभिनेता अर्जुन रामपाल, सोनू सूद दिसत आहेत. शत्रूचा सामना करतेवेळी सीमेवर तैनात असणारे जवानांच्या मनात नेमकी काय भावना असते, याचे चित्रण या गाण्यातून करण्यात आले आहे. या गाण्याच्या निमित्ताने जे.पी. दत्ता, जावेद अख्तर आणि अनू मलिक हे त्रिकूटही पुन्हा एकत्र आले आहे. यापूर्वी बॉर्डर या चित्रपटातील संदेसे आते है या गाण्याच्या निमित्ताने त्यांनी एकत्र काम केले होते. त्याशिवाय एलओसी कारगिल या चित्रपटाच्या वेळीसुद्धा त्यांनी एकत्र काम केले होते.जवळपास पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर हे त्रिकूट पुन्हा एकत्र आले आहेत. दिव्य कुमार, इरफान, आदर्श, खुदा बक्श यांनी या गाण्याला स्वरसाज दिला आहे.  

'पलटन' चित्रपट 1967 साली झालेल्या भारत व चीन युद्धावर आधारीत आहे. जे. पी. दत्ता पुन्हा एकदा देशाचा इतिहास रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ३०० खऱ्याखुऱ्या सैनिकांना घेऊन युद्धाच्या दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, हर्षवर्धन राणे, सिद्धार्थ कपूर, लव सिन्हा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री ईशा गुप्तादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अर्जुन रामपालसोनू सूद